आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहप्रवेशात विघ्न:व्हाइट हाऊसच्या मुख्य द्वारपालाची हकालपट्टी करून गेले ट्रम्प, दरवाजा बंद असल्याने ताटकळले बायडेन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी राष्ट्रपती भवनात एक कर्मचारी नसल्याने झाली गोची

अॅनी कॅर्नी आणि केटी रोगर्स
ही सत्तांतराची पराकाष्ठा होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन पत्नी जिलसोबत व्हाइट हाऊसमध्ये दाखल झाले. नॉर्थ पार्टिकोच्या पायऱ्या चढून त्यांनी हात उंचावत समर्थकांना अभिवादनही केले. गृहप्रवेशासाठी वळले, मात्र दरवाजाच बंद होता. तोवर बायडेन यांचे कुटुंबही पायऱ्या चढले होते. दरवाजा मात्र उघडलाच नाही. महाशक्तीचे नवे प्रमुख ताटकळले. काही क्षण असेच गेले. बायडेन व जिल एकमेकांकडे पाहत होते. अखेर १० सेकंदांनंतर दरवाजा आतून उघडण्यात आला.

माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे माजी व्हाइट हाऊस सोशल सेक्रेटरी ली बेरमॅन म्हणाले, ‘हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.’ इलेक्शन डे ते इनॉग्रेशन डेदरम्यानच्या अडीच महिन्यांत व्हाइट हाऊसमधील घडामोडींची चुणूक यातून दिसते. खरे तर बायडेन यांच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊसमध्ये एकही चीफ अशर (मुख्य द्वारपाल) नव्हता. बायडेन दाखल होण्याच्या पाच तासांपूर्वीच मुख्य द्वारपाल व व्हाइट हाऊसचे व्यवस्थापक टिमोथी हार्लेथ यांची हकालपट्टी करण्यात आली होती. टिमोथी हे ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलचे रूम मॅनेजर होते. २०१७ मध्ये मेलानियांनी त्यांची नियुक्ती केली होती. शपथविधीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तुमच्या सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती टिमोथींना देण्यात आली. टिमोथींनी नोव्हेंबरमध्येच व्हाइट हाऊसचे ब्रीफिंग बुक बायडेन यांच्या हस्तांतरण टीमला पाठवले होते. बहुतेक यामुळेच ट्रम्प यांची खप्पामर्जी झाली होती.

बायडेन यांच्या कौन्सिलने व्हाइट हाऊस कौन्सिलला बायडेन हे आपला मुख्य द्वारपाल आणतील, असे कळवल्याचेही सांगितले जाते. मात्र त्याला कुणीही दुजोरा दिलेला नाही. टिमोथी व्हाइट हाऊसच्या खासगी बाबी व बजेट आदींचेही काम पाहत होते. प्रभावी काम व व्यवस्थापन कौशल्यामुळे टिमोथींची नियुक्ती केली आहे, असा मेलानियांचा दावा होता. त्यांचा पगार २ लाख डॉलर (सुमारे १.४८ कोटी रुपये) होता. हे पद राजकीय नाही, मात्र आपल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्याला व्हाइट हाऊसमध्ये आणून मेलानियांनी पक्षपात केला होता. माजी मुख्य द्वारपाल सांगतात की, राष्ट्राध्यक्ष रात्री उशिरांपर्यंत जागून पहाटेच उठणारा असेल तर मुख्य द्वारपालाला दीर्घकाळ कामावर थांबावे लागते. ट्रम्प असेच होते. मात्र, बायडेन सकाळी लवकर उठत नाहीत, हा नव्या द्वारपालासाठी दिलासा असेल!