आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक:ट्रम्प यांची गरज नाही, ते अयोग्य राष्ट्राध्यक्ष : मिशेल ओबामा

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प म्हणाले- डेमोक्रॅट जिंकले तर बायडेनच्या बॉस होतील कमला हॅरिस

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या डिजिटल राष्ट्रीय संमेलनात मार्गदर्शन केले. यात मिशेल यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. मिशेल यांनी सांगितले, ट्रम्प आपल्या देशासाठी अयोग्य राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी वाईट स्थिती निर्माण केली. ते काम करू शकतात, हे सिद्ध करण्याची अनेकदा संधी आली. मात्र, समस्या वाढवत राहिले. त्यांची आपल्याला गरज नाही. २०१६ च्या निवडणूक निकालाचे दुष्परिणाम आपण भोगतोय. मतदानाचा फायदा झाला नसल्याचे अनेक जण म्हणताहेत. या निवडणुकीत परिवर्तन केले नाही तर स्थिती आणखी वाईट होईल. अराजकता संपवायची आहे. आज एक कृष्णवर्णीय महिला डेमोक्रॅटिक पक्षाच्या मंचावरून बोलत आहे.

हे संमेलन डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नामांकनासाठी होत आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी विस्कॉन्सिनच्या रॅलीत सांगितले, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस जर जिंकले तर चांगले होणार नाही. यामुळे बायडेनच्या बॉस हॅरिस होतील. तुम्हाला बायडेन आणि त्यांच्या बॉस हॅरिस यांच्या उन्मत्त समाजवादी धोरणांच्या अंतर्गत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे? बायडेन मानसिकदृष्ट्या थकले आहेत. हॅरिस रागीट आहेत.

बातम्या आणखी आहेत...