आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका निवडणूक:सर्व सर्वेक्षणांत बायडेन यांच्या तुलनेत ट्रम्प मागे; सर्व सर्वेक्षणे खोटी, मी हरणार नाही : ट्रम्प

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताज्या सर्वेक्षणात ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन यांना 15 अंकांची आघाडी

सर्व सर्वेक्षणांत डेमोक्रॅट उमेदवार जो बायडेन यांच्या तुलनेत मागे पडलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निवडणूक हरल्यानंतर निकाल सार्वजनिकरीत्या स्वीकारण्याचे आश्वासन देणे टाळत आहेत. त्यांनी सांगितले की, सध्या ते घाईचे ठरेल. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला बघावे लागेल. मी हा सांगत नाही तसेच नादेखील सांगत नाही. गेल्या वेळीही मी हेच सांगितले होते. ट्रम्प म्हणाले, पहिली गोष्ट ही की मी हरणारा नाही. सर्व सर्वेक्षणे खोटी आहेत, प्रायोजित आहेत. २०१६ मध्ये असे सर्वेक्षण खोटे ठरले होते. कोरोनाचा सामना करण्याच्या त्यांच्या पद्धती व अाफ्रिकी-अमेरिकी जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्यानंतर गदारोळ झाल्याने ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ताज्या सर्वेक्षणात ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन यांना १५ अंकांची आघाडी दाखवण्यात आली आहे. 

ट्रम्प म्हणतात की, सर्वेक्षणात रिपब्लिकन समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अमेरिकेचे लोक योग्य निर्णय घेतील. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष असूनही ट्रम्प अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास दाखवू शकले नाहीत. चार वर्षांपूर्वीही डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटनसोबतच्या लढतीत अडकलेले ट्रम्प यांनी मतदानाच्या काही वेळेआधी म्हटले होते की, जर डेमोक्रॅट जिंकले तर ते निकालाचा सन्मान करण्यास प्रतिबद्ध नाहीत.

एक लाखापेक्षा जास्त भारतीय-अमेरिकींनी पाहिली ‘हिंदूज4ट्रम्प’ डिजिटल रॅली
अमेरिकी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात आयोजित ‘हिंदूज4ट्रम्प’ रॅलीला विक्रमी संख्येत एक लाखापेक्षा जास्त भारतीय-अमेरिकींनी पाहिले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन मैदानात आहेत. आयोजकांनुसार सोशल मीडियावर सुमारे ३० हजार जणांनी रॅली लाइव्ह तर सुमारे ७० हजारांनी ऑनलाइन पाहिली.

बातम्या आणखी आहेत...