आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या स्पर्धेत ट्रम्प फक्त 13 तर विरोधी बायडेन 25 राज्यांमध्ये आघाडीवर

वॉशिंग्टन10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • द इकॉनॉमिस्टसह तीन मोठ्या सर्व्हेत डेमोक्रॅटिक नेते बायडेनपेक्षा ट्रम्प मागे
  • जॉर्जिया, टेक्सास, लोवा, ओहियो या वेळी ट्रम्प यांच्यासाठी आव्हान ठरतील

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाबाबत शंका-कुशंका सुरू असतात. ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकण्याची शक्यता गेल्या ४ महिन्यांत कधीच चांगली दिसली नाही. महाभियोगाच्या खटल्यातून मुक्त झाल्यानंतर त्यांची रेटिंग ३ वर्षांतील उच्च पातळीवर नक्की गेली, मात्र कोरोना संकट आणि जॉर्ज फ्लॉइडचे प्रकरण हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे श्रीयुत डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय बाजारभाव जमिनीवर आपटला आहे. कोरोनामुळे १ लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, ३ कोटी लोकांच्या नाेकऱ्या गेल्या आणि वंशवादावरील आंदोलनाबाबत त्यांच्या भूमिकेने विरोधी उमेदवार आणि बराक ओबामा यांचे आवडते उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडेन यांना आघाडी दिली आहे. एवढेच नव्हे तर बायडेन सहानुभूती मिळवण्यातही ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे गेले आहेत. यामुळे दोघांमध्ये मोठा फरक निर्माण झाला आहे.

जो बायडेन यांच्या आघाडीचा अंदाज यावरूनच लावता येईल की राष्ट्रपतिपदाच्या लोकप्रियतेबाबत ते फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा थोडेच पुढे होते. मग हे अंतर ५% राहिले. त्यानंतर १२% आणि जून येता येता बायडेन यांची आघाडी १४% झाली. राष्ट्रीय पातळीवर बघता सध्याच्या स्थितीत निवडणूक झाल्यास बायडेन अमेरिकेतील ५० राज्यांपैकी २५ मध्ये सरळ सरळ आघाडीवर आहेत, तर ट्रम्प केवळ १३ राज्यांमध्ये स्पष्ट विजय मिळवताना दिसत आहेत. ८ राज्यांमध्येे दोन्ही उमेदवार ५०-५० आहेत, तर ४ राज्यांमध्ये सध्या अनिश्चिततेची स्थिती आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार असल्याने दोघांकडे तयारीसाठी खूप वेळ आहे.

मतांचा संभाव्य पॅटर्न : या पद्धतीने समजून घ्या कशी बदलतील निवडणुकीची समीकरणे

द इकॉनॉमिस्टने देशभरात सर्व्हे, राजकीय स्थिती, आर्थिक तथ्य आणि इतर घटना बघून मतदारांचा विचार, मतांची टक्केवारी आणि मतदारांच्या वागण्यातील बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात अमेरिकेतील ५० राज्यांशी संबंधित या मुद्द्यांवरून हे समजण्याचा प्रयत्न केला आहे की, कोणत्या राज्याचे मतदार कसे वागतात. त्यानुसार एका विचारसरणीचे मतदार निवडणुकीत एकत्र राहण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जर मिनेसोटात जिंकतात तर त्यांची विस्कोन्सिनमध्येही जिंकण्याची शक्यता वाढते.

वॉशिंग्टन पोस्टचा सर्व्हे : बहुतांश महिला बायडेनसोबत, कॉलेज विद्यार्थी ट्रम्पच्या बाजूने

वॉशिंग्टन पोस्ट- एनबीसी सर्व्हेतही ट्रम्प मागे दिसतात. यात बायडेनना ५०%, तर ट्रम्पना ४२% मते मिळाली आहेत. महिला बायडेनच्या बाजूने जास्त आहेत. तर ट्रम्पना महाविद्यालयीन युवकांचा जास्त पाठिंबा मिळाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८०% अमेरिकींनी मान्य केले की कोरोना आणि वंशवादाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ज्या राज्यांत ट्रम्प पुढे होते, तेथेही बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. अशा राज्यात बायडेनना ५०% तर ट्रम्पना ४२% मते मिळताहेत.

४ राज्यांत अनिश्चितता, ८ राज्यांमध्ये दोघांना जिंकण्याची ५०-५० संधी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्यासाठी या वेळी त्या राज्यांमध्ये जास्त आव्हान आहे, जेथे ते २०१६ मध्ये खूप सहजपणे जिंकले होते. यात जॉर्जिया, टेक्सास, ओहिओ आणि लोवासारखी राज्ये आहेत. मात्र या वेळी येथे जो बायडेन पुढे आहेत. ट्रम्प यांचा दबदबा असलेल्या फ्लोरिडा आणि अॅरिझोनातही बायडेन मजबूतपणे पुढे जात आहेत. जॉर्जियाला तर या वेळी निवडणूक युद्धाचे सर्वात मोठे रणांगण मानले जात आहे. कारण येथील ३२% पेक्षा जास्त मतदार अमेरिकी-आफ्रिकी वंशाचे आहेत. तसेच हिस्पॅनिक ३१.२% आहेत, यात कृष्णवर्णीय आहेत. वंशवादविरोधातील आंदोलनादरम्यान बायडेन त्यांची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी ठरले. जॉर्जियात तीन दिवसांपूर्वी प्राथमिक निवडणुकीत मतदान यंत्र नादुरुस्त होणे, बिघडणे आणि छेडछाडीचे प्रकरण चर्चेत आले होते.

सीएनएनच्या सर्व्हेतही ट्रम्प यांना बायडेनपेक्षा मागे म्हटले आहे. २०२० च्या निवडणुकीत बायडेन सुमारे १४% मतांनी पुढे दिसताहेत. त्यांना ५५% मतदारांनी पाठिंबा दिला आहे, तर ट्रम्प यांना केळ ४१%नी. सर्व्हेत ट्रम्पना कोरोना विषाणू आणि वंशवादावरील सध्याच्या गोंधळाने नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला खोटे सांगत सीएनएनला हा सर्व्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र, सीएनएनने स्पष्ट केेले आहे की, सर्व्हे मागे घेणार नाही.

बातम्या आणखी आहेत...