आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ट्रम्प यांना केस धुण्यासाठी पाणी पडतेय कमी! दर मिनिटाला 9.5 लिटर पाणी असूनही अडचण

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 28 वर्षे जुना शाॅवर वाॅटर कायदा बदलण्याचा प्रस्ताव

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांना स्नानादरम्यान केस धुण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सरकारने शाॅवर वाॅटर प्रेेशर नियमांत बदल करण्यासाठी याेजना तयार केली आहे. त्यासाठी वीज विभागाने प्रस्तावही मांडला आहे.

अमेरिकेत १९९२ च्या कायद्यानुसार शाॅवरहेड्समधून प्रतिमिनिट २.५ गॅलन (९.५ लिटर)पेक्षा जास्त पाणी साेडता येत नाही. शाॅवरहेड्सची ही मर्यादा वाढवली पाहिजे. मी केस धुण्यासाठी जाताे. तेव्हा पुरेसे पाणी मिळतच नाही. हात धुण्यासाठी देखील पाणी कमी पडते. अशा स्थितीत मी काय करावे? शाॅवरहेडखाली जास्त तसाच उभा राहू? मला इतरांबद्दल माहिती नाही. परंतु माझे केस मात्र चांगले राहिले पाहिजेत. दुसरीकडे, नियमांत बदल केल्यास पाण्याचा जास्त अपव्यय हाेईल, असे ग्राहक हक्कासाठी काम करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे. वीज संरक्षण समूहाचे कार्यकारी संचालक अंड्र्यू डेलास्की म्हणाले, सरकारचा प्रस्ताव मूर्खपणाचा आहे. राष्ट्राध्यक्षांना चांगले शाॅॅवर घ्यायचे असल्यास चांगल्या शाॅवरहेडची माहिती देणाऱ्या ग्राहकसंबंधी संकेतस्थळाबद्दल सांगितले पाहिजे.

एक ग्राहक तज्ञ डेव्हिड फ्राइडमॅन म्हणाले, अमेरिकेत घरांत चांगल्या गुणवत्तेचे शाॅवरहेड लागलेले आहेत. त्याबद्दल संशय व्यक्त केला जाऊ शकत नाही. प्रकरण काेर्टातही जाऊ शकते. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये व्यावसायिकांची बैठक घेतली हाेती. लाेक १०-१५ वेळा टाॅयलेट फ्लश करतात. परंतु, एकाच प्रयत्नात व्हायला हवे, असे सांगून त्यांनी उपस्थितांना चकीत केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...