आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इराक युद्धामध्ये 17 नागरिकांची हत्या करणाऱ्या चार कंत्राटी खासगी सैनिकांना ट्रम्प यांनी दिली माफी!

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने पहिल्यांदाच 2007 मध्ये युद्ध लढण्यासाठी वापरले भाडेतत्त्वावर सैनिक
  • बगदादमध्ये सामान्य लोकांच्या हत्येच्या प्रकरणात ब्लॅकवाॅटर कंपनीचे सैनिक भोगत होते शिक्षा

२००७ मध्ये इराकच्या युद्धात १७ नागरिकांच्या हत्या प्रकरणातील दोषी खासगी लष्करी कंपनी ब्लॅकवॉटरच्या चार सैनिकांना अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी माफी दिली आहे. या प्रकरणात चारही दोषी शिक्षा भोगत होते. अमेरिकेने इराक युद्धात खासगी सैन्य कंपनीला भाड्याने घेतले होते. अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती.

अमेरिकेच्या सैन्याने या खासगी लष्करी कंपनीला युद्ध लढण्याचे कंत्राट दिले होते. त्यात बहुतांश निवृत्त अमेरिकी सैनिक होते. युद्धात अमेरिकेला प्रत्येक प्रकारची मदत करणे व इराकी सैनिक-पोलिसांना प्रशिक्षण देण्याची कंपनीची जबाबदारी होती. युद्ध क्षेत्रात भाड्याच्या सैनिकांचा प्रयोग व त्यांच्याद्वारे सामान्य नागरिकांच्या हत्येनंतर जगभरात या कृतीला विरोध झाला होता. इराक युद्धात ब्लॅकवॉटरचे सैनिक पॉल स्लॉग, इवेन लिवर्टी, डस्टिन हर्ड व निकोलस स्लाटन मशीन गन व ग्रेनेड लाँचर व स्नायपरसह या ताफ्यातील सदस्य होते. हा ताफा एका अमेरिकी मुत्सद्द्यासोबत चालत होता. या ताफ्याने इराकची राजधानी बगदादच्या निसौर चौकात नि:शस्त्र लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. मृतांमध्ये दोन मुलांसह १७ सामान्य नागरिकांचा समावेश होता. आम्ही बंडखोरांच्या आत्मघाती हल्ल्यापासून संरक्षणासाठी गोळ्या झाडल्या होत्या, असे ब्लॅकवॉटरच्या वकिलाने युक्तिवादात म्हटले होते.

ब्लॅकवॉटरने नाव बदलले

एफबीआयने घटनास्थळावर जाऊन या प्रकरणाचा तपास केला. त्यास लाय नरसंहार असे एफबीआयने संबोधले होते. १९६८ मध्ये व्हिएतनाम युद्धातही अमेरिकी सैनिकांनी निर्दोष गावकऱ्यांचा नरसंहार केला होता. त्यालाही लाय नरसंहार म्हटले गेले. दरम्यान, इराकमधील घटनेत २०१४ मध्ये चार सैनिकांवरील आरोप सिद्ध झाला. त्यांना प्रत्येकी तीस वर्षांची शिक्षा झाली होती. इराकच्या नागरिकांच्या हत्याकांडानंतर ब्लॅकवॉटरवर टीका झाली होती. आता ब्लॅकवॉटरने आपले नाव बदलून एक्सई सर्व्हिस असे ठेवले आहे. अमेरिकेने अनेक युद्धात अशा प्रकारच्या वेगळ्या पद्धतींचा वापर करून युद्ध जिंकण्याचे प्रयत्न केले आहेत. रासायनिक हल्ल्याचाही वापर अमेरिकेने केला होता, असा आरोप अमेरिकेवर केला जातो.

बातम्या आणखी आहेत...