आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात शुक्रवारी प्रथमच त्यांच्या साक्षीचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते तक्रारदार महिला जीन कॅरोल यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करत स्वतःवरील आरोप निराधार असल्याचा आरोप करताना दिसून येत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गत ऑक्टोबरमध्ये ही साक्ष दिली होती. ती आता मॅनहॅटन कोर्टात सादर करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये ट्रम्प कॅरोलविषयी म्हणतात, 'ती माझ्या टाइपची नाही'. त्यानंतर त्यांना जेव्हा कोर्टात जीन कॅरोल यांचा फोटो दाखवला जातो, तेव्हा ते तिचा उल्लेख पत्नी म्हणून करतात. त्यानंतर त्यांना त्या जीन असल्याचे सांगितले जाते. त्यावर ट्रम्प चित्र अंधूक असल्यामुळे आपण त्यांना ओळखले नसल्याचे सांगतात. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वीच आपण जीन कॅरोलला ओळखत नसल्याचे सांगितले आहे.
'मोठे स्टार्स परवानगीशिवाय महिलांची छेड काढतात'
वकिलांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, अनेक स्टार महिलांच्या परवानगीशिवाय त्यांची छेड काढतात. अनेक वर्षांपासून हे चालत आले आहे. ट्रम्प यांनी आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला मानसिक आजार असल्याचाही दावा केला.
व्हिडिओमध्ये ट्रम्प कॅरोलबद्दल सांगतात, 'ती माझ्या टाइपची नाही'. या जबाबाचा व्हिडिओ 48 मिनिटांचा आहे. त्यात ट्रम्प यांनी महिलांच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या विधानाचाही समावेश आहे. त्यावर ते म्हणाले की, हे लॉकर रूमचे संभाषण होते.
ट्रम्प चौकशी करणाऱ्या वकिलाला म्हणाले होते - तुम्हीही माझ्या टाइपच्या नाही
ट्रम्प यांच्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, त्यांनी उलटतपासणी करणाऱ्या महिला वकिलावरही आक्षेपार्ह विधान केले. ते अॅटर्नी रॉबर्टा कॅप्लनला म्हणाले - तुम्ही देखील माझ्या टाइपच्या नाही. मला आशा आहे की तुम्हाला याचे वाईट वाटणार नाही. युक्तिवादावेळी ट्रम्प यांनी रॉबर्टा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला.
ट्रम्प यांच्या वकिलांच्या माहितीनुसार, ते पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणार नाहीत. तथापि, ट्रंप यांनी अन्य एका व्हिडिओद्वारे या सुनावणीमुळे आपल्याला आयर्लंडचा दौरा रद्द करावा लागल्याचे स्पष्ट केले.
काय आहे ट्रम्पवरील बलात्काराच्या आरोपांचे प्रकरण
मॅगझिन रायटर ई. जीन कॅरोल यांनी ट्रम्पवर 1995-96 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कॅरोल यांच्या दाव्यानुसार, न्यूयॉर्कच्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यांनी याविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प यांनी त्यांची बदनामी केली. आपल्या पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी कॅरोल यांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यानंतर कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर बॅटरी अर्थात मारहाण व मानहानीचा खटला दाखल केला. सध्या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.