आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक:ट्रम्प म्हणाले - मी बराक ओबामांमुळे राजकारणात आलो, त्यांनी चांगले काम केले असते तर मी निवडणूक लढवली नसती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प म्हणाले - ओबामा आणि बिडेन यांनी चांगले काम केले असते तर मी राष्ट्रपती नसतो, कदाचित मी निवडणूकही लढवली नसती
  • 19 ऑगस्टला माजी अमेरिका राष्ट्राध्यक्ष ओबामा म्हणाले होते - ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्ष होण्याची क्षमता येऊ शकली नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की - माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी चांगले काम केले नाही. याच कारणामुळे आज मी तुमच्यासमोर राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा आहे. जर त्या दोघांनी चांगले काम केले असते तर मी येथे नसतो. कदाचित मी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकही लढवली नसती.

जो बिडेन बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना आठ वर्षे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. यावेळी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ते डेमोक्रॅटिकच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ते ट्रम्प यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरत आहेत.

ओबामांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती

बिडेन मोहिमेद्वारे बुधवारी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते म्हणाले- ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाला निराश केले आहे. मला आशा होती की, देशहितासाठी ते त्यांचे कार्य गांभीर्याने घेतील. परंतु त्यांनी ते कधीच केले नाही. त्यांच्यात राष्ट्राध्यक्षांसारखी क्षमता येऊ शकली नाही. कारण ते त्यास पात्र नाहीत. त्यांच्यामुळे 1.70 लाखाहून अधिक अमेरिकन लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि लाखो लोक बेरोजगार झाले आहेत.

ट्रम्प यांनी समस्या आणखी वाढवल्या: मिशेल ओबामा

माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये सामील झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ट्रम्प हे आपल्या देशासाठी चुकीचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांनी देशाला गरज नाही. ट्रम्प काम करू शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अनेक संधी मिळाल्या. मात्र त्यांनी अडचणी जास्त वाढवल्या आहेत. सध्याच्या काळानुसार ते ठीक नाहीत.

मिशेल ओबामा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले, ' त्यांचे भाषण लाइव्ह नव्हते. ते बऱ्याच काळापूर्वी रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यांनी भाषणात उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा उल्लेखही केला नाही.