आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीन दिवसांपूर्वी कोरोना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढले आहेत मात्र त्यांच्या तब्येतीविषयी सस्पेंस आहे. शनिवारी तीन वक्तव्य आले. तिन्हीही वेगवेगळे आहेत. ट्रम्प यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले - मी चांगगला आहे.. त्यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस म्हणाले - राष्ट्राध्यक्षामधील कोरोना लक्षण हे चिंता वाढवणारे आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे पर्सनल फिजिशियन डॉक्टर सीन कॉनलेंनुसार - प्रेसिडेंट यांची प्रकृती चांगली आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 3, 2020
ट्रम्प यांच्यावर मेरीलँडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पत्नी मेलानिया व्हाइट हाउसमध्येच क्वारंटाइन आहेत. मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन पार्टीने प्रचारासाठी नवीन रणनिती तयार केली केली आहे. सीनेटर्सची एक मोठी टीम बनवण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी व्हिडिओ केला होता जारी
राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी रात्री रुग्णालयातून एक व्हिडिओ जारी करुन म्हटले होते की - आता मला चांगले वाटत आहे. एक दोन-दिवसात काय होते पाहू. मला वाटते की, आता स्थिती जास्त स्पष्ट झाली आहे. ट्रम्प सूटमध्ये दिसले होते, मात्र त्यांनी टाय घातलेले नव्हती. यामध्ये दोन गोष्टी आहेत. शुक्रवारी रात्री जेव्हा ते रुग्णालयात आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की - माझी तब्येत चांगली नाही. शनिवारी ते म्हणाले - आता मला खूप चांगले वाटत आहे. लवकरच कामावर परतेल.
डॉक्टर आणि एडवायजरचे वक्तव्य वेगळे
शनिवारी त्यांच्या डॉक्टरांनी म्हटले - राष्ट्राध्यक्षांवर उपचार सुरू आहेत आणि आता त्यांना चांगले वाटत आहे. मात्र शंका त्यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस यांच्या वक्तव्याने वाढवली. मेडोस म्हणाले - पुढचे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. यादरम्यान आपल्याला आजाराच्या गंभीरतेविषयी योग्य माहिती मिळू शकेल. सध्या आम्ही रिकव्हरीविषयी स्पष्ट काहीच सांगू शकत नाही. या दोन्हीही वक्तव्यांमध्ये स्पष्टपणे विरोधाभास आहे. यामुळेच राष्ट्राध्यक्षांनी स्वतः वक्तव्य जारी करत ते ठीक असल्याचे म्हटले.
रिपब्लिकन पार्टीची नवीन कॅम्पेन स्ट्रॅटेजी
निवडणुकीला केवळ एक महिना शिल्लक आहे. राष्ट्राध्यक्ष आजारी आहेत आणि रुग्णालयात आहेत. ते कधी बरे होतील याविषयी सध्याच काही सांगता येणार नाही. दरम्यान त्यांच्या पार्टीने इलेक्शन कॅम्पेनसाठी नवीन रणनिती तयार केली आहे. व्हाइस प्रेसिडेंट माइक पेंसी आणि स्पीकर नेंसी पेलोसीसोबत सीनेटर्सची एक टीम प्रत्येक राज्यात जाईल. शक्य झाले तर ट्रम्प व्हिडिओ मॅसेज करत राहतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.