आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची चीनविरोधात कठोर भूमिका:ट्रम्प म्हणाले - टिकटॉकवर बंदी आणण्याचा विचार सुरू, मायक्रोसॉफ्ट खरेदी करु शकते हे व्हिडिओ अॅप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प प्रशासन बाइटडान्सला टिकटॉकडून अमेरिकेत आपले मालकीचे हक्क विकण्याचा आदेश देऊ शकते
  • टिकटॉकवर अमेरिकेतील लोकांचा खासगी माहिती चीनला पाठवण्याचा आरोप आहे, अनेक नेत्यांनी केले टिकटॉक बंदीचे समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले- आम्ही टिकटॉकवर बंदी घालू शकतो. आणखी काही पर्याय आहेत. पुढे काय होते ते पाहूया. प्रतीक्षा करायला हवी. असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी यापूर्वीही बर्‍याच वेळा टिकटॉकवर बंदी घालण्याविषयी सांगितले आहे. परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ आणि अनेक उच्च अधिकाऱ्यांनीही त्यांचा मुद्दा पुन्हा सांगितला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टिकटॉकमुळे राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे. हे चीनमधील लोकांची वैयक्तिक माहिती पाठवते.

सोमवारपर्यंत टिकटॉक खरेदीचा सौदा ठरेल

मायक्रोसॉफ्ट टिकटॉकची मूळ कंपनी बायटडांसशी चर्चा करीत असल्याचे वृत्त आहे. त्याअंतर्गत मायक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकीटॉकचा व्यवसाय खरेदी करू शकते. सोमवारपर्यंत हा करार निकाली निघण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात फायनान्शियल टाईम्सने असा दावा केला की अमेरिकन कंपनी सिकोइया आणि जनरल अटलांटिका हे खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. अमेरिकन कंपनीने विकत घेतल्यानंतर बंदी रोखता येईल का की नाही यावर या दोन्ही कंपन्या ट्रेझरी विभागाकडून तपास करत होत्या.

टिकटॉकला मालकी हक्क विक्री करण्यास सांगितले जाऊ शकते

ब्लूमबर्ग आणि वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, ट्रम्प प्रशासन बाइटडांसला टिकटॉकचे मालकी हक्क विकण्याचा आदेश देऊ शकतो. यासंबंधी आदेश एक दोन दिवसात जारी होऊ शकतो. टिकटॉकवर बंदी आणण्याचे अनेक नेत्यांनी समर्थन केले आहे. सीनेटर मार्को रिबियोने शुक्रवारी सांगितले की, सध्याच्या फॉर्मेटमध्ये हे अॅप आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप धोकादायक आहे. काही सीनेटर्सने बंदीची मागणवीषयी अटॉर्नी जनरलला लेटरही लिहिले आहे.

चीनपासून अंतर ठेवत आहे टिकटॉकची पेरेंट कंपनी

टिकटॉक मॅनेजमेंट काही महिन्यांपासून बीजिंगपासून अंतर ठेवत आहे. मे महिन्यातच यांनी डिजनीसंबंधी केविन मेयरला आपला सीईओ बनवले आहे. याची पॅरेंट कंपनी बाइट डान्सचे ऑफिस लास एंजिल्स, लंडन, पॅरिस, बर्लिन, दुबई, मुंबई, सिंगापूर, जकार्ता, सिओल आणि टोकयोमध्ये आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने आपले मुख्यालय बीजिंगपासून वॉशिंग्टनमध्ये हलविण्याविषयी देखील सांगितले होते. तसेच त्यांनी आपल्यावरील हेरगिरी केल्याचा आरोपही नाकारला होता.