आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर ट्रम्प अजूनही पक्षात किंगमेकर, मध्यावधीत बहुतांश रिपब्लिकन ट्रम्प यांचे समर्थक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. रिपब्लिकन पार्टी व डेमोक्रॅटिक पार्टी उमेदवार निवडीत व्यग्र आहेत. रिपब्लिकन पक्षावरील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पकड स्पष्ट जाणवू लागली आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेतून हे दिसून आले आहे. रिपब्लिकन पार्टीचे बहुतांश उमेदवार ट्रम्प यांच्या राष्ट्रवादाच्या सिद्धांताचे समर्थक आहेत. ट्रम्प यांची थिअरी कट्टर राष्ट्रवाद व २०२० च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत घोटाळा झाल्याचे मानणारी आहे. त्याचबरोबर बायडेन यांची निवड खोटी असल्याचे हे समर्थक सांगतात. गेल्या निवडणुकीच्या वेळी ट्रम्प समर्थकांनी याच विचारांच्या आधारे कॅपिटलचा हिंसाचार घडवला होता. पेनसिल्व्हेनिया व उत्तर कॅरोलिनामध्ये रिपब्लिकनच्या प्रायमरीमध्ये ट्रम्प समर्थकांचाच विजय झाला होता. अमेरिकेतील निवडणुकीत रिपब्लिकन असो की डेमोक्रॅटिक पक्ष यांच्या उमेदवारांना आधी अंतर्गत निवडणुकीत विजय मिळवावा लागतो. पक्षाचे समर्थक अगोदर त्यांना मते देतात.

त्यानंतर विजयी उमेदवार जनतेमध्ये जातात. ट्रम्प यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्य निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली नाही. परंतु मध्यावधी निवडणुकीतील ट्रम्प समर्थकांना मिळालेल्या उमेदवारीवरून ट्रम्प हेच पक्षाचे किंगमेकर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी पक्षावरील आपली मजबूत पकड सैल होऊ दिलेली नाही. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी पक्षाबरोबरच चर्चवरील आपला प्रभाव देखील कमी होऊ दिलेला नाही. अमेरिकेतील अनेक चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेत ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आवाहन देखील केले जाते.२०२० च्या निवडणुकीतील ९ राज्यांत विजयी उमेदवारांपैकी ४४ टक्के खासदार ट्रम्प यांचे समर्थक असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. २०२० मधील निवडणुकीतील गैरव्यवहारामुळे बायडेन विजयी झाल्याचा आरोप करणारे हे सर्व सदस्य आहेत. २३ टक्के खासदारांनी निवडणुकीच्या निकालातील विलंब ही सबबही पुढे केली होती. त्यांनी तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांना एक पत्र देखील पाठवले होते. ११ टक्के खासदारांनी मतमोजणीसाठी दुसऱ्या पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची मागणीही केली होती. ७ टक्के खासदारांनी बायडेन यांच्या विजयाला न्यायालयात आव्हान दिले होते. २०२० च्या निवडणुकीत अ‍ॅरिझोना, जॉर्जिया, नेवाडा, फ्लोरिडासारख्या प्रांतातून सर्वाधिक रिपब्लिकन सदस्यांनी मिडटर्म प्रायमरीसाठी ट्रम्प यांना आपला पाठिंबा दिला होता.

अमेरिकेतील काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची विधेयके अद्यापही पारीत झालेली नाहीत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना त्यात यश मिळालेले नाही. त्यात बिल्ड बॅक बॅटर पॅकेजचा त्यात समावेश आहे. डेमोक्रॅट्सची सदस्य संख्या कमी असल्याने ते पारीत होऊ शकलेले नाही. ऑगस्टपासून बायडेन यांच्या लोकप्रियतेत देखील घसरण दिसून येत आहे. त्यांचे रेटिंग ५० टक्क्यांहून कमी झाले आहे. त्यामागे बायडेन यांचे पुत्र हंटरचा कर घोटाळा कारणीभूत मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...