आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवे पाऊल:दबावापुढे ट्रम्प झुकले, विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील 17 राज्ये, कंपन्या आणि मोठ्या विद्यापीठांनी या आदेशाला दिले होते आव्हान

अमेरिकेत राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम विभागाने ही माहिती कोर्टाला दिली. ट्रम्प प्रशासनाने गेल्या आठवड्यात सप्टेंबर ते डिसेंबरमधील सत्रात अमेरिकन विद्यापीठांतून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मायदेशी परत जावे असा आदेश दिला होता. अशा सर्व विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोविड -१९ च्या साथीमुळे अमेरिकेतील बऱ्याच विद्यापीठांमध्ये सध्या ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या निर्णयामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अमेरिकेने हाँगकाँगच्या स्वातंत्र्याबद्दलच्या कायद्यालाही मंजुरी दिली. त्यावर चीनने सूड घेऊ असा इशारा दिला आहे.

२ लाख विद्यार्थ्यांवर झाला असता परिणाम

ट्रम्प हे कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच लॉकडाऊनच्या विरोधात होते. अमेरिकन विद्यापीठांना ऑनलाइन वर्ग सुरू करावे अशी ट्रम्प यांची इच्छा नव्हती. अमेरिकेच्या शैक्षणिक संस्था कोरोनाच्या आधीच्या दिवसांप्रमाणे चालल्या पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच या निर्णयाद्वारे ते विद्यापीठे आणि राज्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. याचा एकूण १० लाख परदेशी विद्यार्थ्यांवर परीणाम झाला असता. अमेरिकेत सध्या २ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी आहेत.

भारतीयांंसाठी ग्रीन कार्ड वेटिंग टाइम कमी करू : बायडेन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडेन म्हणाले, अध्यक्ष झाल्यास ग्रीन कार्डवरील देश-आधारित सीमा काढून टाकू. यामुळे ग्रीन कार्डसाठी अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांची प्रतीक्षा कमी होईल. बायडेन यांनी यापूर्वीही राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या एच -१ बी व्हिसावरील कायमची बंदी काढून टाकू, असे आश्वासन दिले आहे.

हा विद्यार्थ्यांचा विजय आहे : स्नायडर

अमेरिकन काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. काँग्रेसचे ब्रॅड स्नायडर म्हणाले, हा परदेशी विद्यार्थी, महाविद्यालये आणि कॉमनसेन्सचा विजय आहे. ट्रम्प प्रशासनाने आठवडाभरात मागे घ्यावे लागतात असे कायदे करू नयेत. गेल्या आठवड्यात १३६ काँग्रेसमन आणि ३० सिनेटर्सनी ट्रम्प प्रशासनाला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. या निर्णयावर भारत सरकारनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केवळ ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांचा व्हिसा रद्द होणार होता.