आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trump Supporters And Channels Spreading Hatred Against Immigrants, Attacks On Indians Increase | Marathi News

भारतीयांवर हल्ले वाढले:स्थलांतरितांविरुद्ध द्वेष पसरवताहेत ट्रम्प समर्थक व चॅनल, गोऱ्यांचे श्रेष्ठत्व वाढवण्याच्या पॅटर्नमुळे चिंता

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थक आणि त्यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करणाऱ्या वृत्तवाहिन्या भारतीयांसह स्थलांतरितांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध हिंसाचार वाढला आहे. ट्रम्प समर्थक कथानक रचत आहेत की, निर्वासितांमुळे श्वेतवर्णीय धोक्यात आहेत. वाहिन्या संभ्रम निर्माण करत आहेत की, भारतीय वंशाचे स्थलांतरित एक दिवस अमेरिका आणि श्वेतवर्णीयांवर वरचढ ठरतील. त्याला “ग्रेट रिप्लेसमेंट थेरी’चे नाव दिले आहे. ट्रम्प यांची खुर्ची गेल्यानंतर या विचारसरणीने जोर पकडला आहे.

सेंटर फॉर स्टडी ऑफ हेट अँड एक्ट्रिमिझमनुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये आशियाई लोकांविरुद्ध हेट क्राइम ३३९% वाढला आहे. न्यूयॉर्कमध्ये महिन्यापूर्वी सहा शिखांवर हल्ला झाला. ३० वर्षांपासून न्यूयॉर्कच्या रिचमंड हिल्समध्ये राहणारे कुलदीपसिंह म्हणाले, लोकांची मानसिकता बदलत आहे. आधी एवढी भीती वाटत नव्हती. १८ मे रोजी एका अमेरिकीने भारतीय विद्यार्थ्याचा गळा घोटला. गेल्या वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ५६७% आणि न्यूयॉर्कमध्ये ३६१% हेट क्राइम वाढला आहे.

भारतीयांचा एवढा द्वेष का? अमेरिकेत ४५ लाख भारतीय आहेत. ही संख्या अमेरिकेतील लोकसंख्येच्या १.४% आहे. मात्र, तो सर्वात प्रभावी आणि श्रीमंत वर्ग आहे. बायडेन प्रशासनात दोन डझनहून जास्त भारतीय वंशाचे लोक उच्च पदांवर आहेत. आयटी सेक्टरमध्ये वर्चस्व आहे. १५-२० संसदेच्या जागा व राज्यांच्या १०० जागा जिंकलेल्या भारतीयांची महत्त्वाची भूमिका आहे.

आशियाईंवर संशय घेणारे वाढले सोशल ट्रॅकिंग स्टडीनुसार, २१% अमेरिकी कोविडसाठी आशियाई लोकांना अंशत: जबाबदार धरत आहेत. प्रथम ११% च असे होते. आशियाई मूळ देशापेक्षा जास्त प्रामाणिक आहेत, असे मानणारे अमेरिकी ३३% झाले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा केवळ २०% होता.

बातम्या आणखी आहेत...