आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे ७६ वर्षीय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री १०.५५ वाजता मॅनहटन जिल्हा न्यायालयात दाखल झाले. तिथे त्यांनी शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करून सुमारे तासभर कोठडीत ठेवले. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास न्यायाधीश जुआन मर्चंट यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हेगारी खटल्यात न्यायालयात हजेरी लावणारे ट्रम्प हे अमेरिकी इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
न्यायालय परिसरात अटक केल्यानंतर दरवाजा बंद करून त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. छायाचित्र काढण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत सिक्रेट सर्व्हिस जवान होते. कोर्टात हजर केल्यानंतर ट्रम्प यांच्यासमक्ष त्यांच्यावरील आरोपांचा सीलबंद लिफाफा उघडण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवण्यात आले. आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांच्यावर ३४ आरोप लागू शकतात. रात्री उशिरापर्यंत न्यायालयीन कारवाई सुरू होती. न्यायालयातील हजेरीनंतर ट्रम्प फ्लोरिडा येथे जाण्याची शक्यता आहे. तिथे ते निवडणूक प्रचार सभेत भाषण करणार आहेत.
पॉर्नस्टारला १.३० लाख डॉलर्सची रक्कम दिली
{ अॅडल्ट चित्रपट अभिनेत्री स्टॉर्मी डेनियल्ससोबत संबंध लपवण्यासाठी तिला २०१६ मध्ये १.३० लाख डॉलर्सची रक्कम दिल्याचा आरोप ट्रम्पवर आहे.
{ न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरपासून मॅनहटन कोर्टांपर्यंत ३५,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.