आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मध्यावधी निवडणूक 8 नोव्हेंबरला:ट्रम्प अमेरिकींना सांगताहेत, फक्त श्वेतवर्णीयांना मते द्या

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ८ नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीतून पुढील राष्ट्राध्यक्ष निवडीची दिशा ठरणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, मात्र मध्यावधी निवडणूकच त्यांना जड जाणार असे दिसते. ट्रम्प यांच्याकडून गेल्या आठवड्यात घरोघरी एक पोस्टर पाठवण्यात आले असून, श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीयांपासूून धोका अाहे, त्यामुळे फक्त श्वेतवर्णीय उमेदवारांना मते द्या, असे त्यात म्हटले आहे.

पोस्टरवरील छायाचित्रे चुकीच्या संदर्भाने आणि हेराफेरी करून लावण्यात आली आहेत. तथापि, याद्वारे बायडेन प्रशासन हे श्वेतवर्णीयांबाबत वर्णभेदी असल्याचे एकप्रकारे मतदारांना सूचित करण्यात आले आहे. ट्रम्प यांचे सल्लागार स्टीफन मिलर यांच्याकडून पाठवण्यात आलेले हे पोस्टर अमेरिकेतील अनेक कृष्णवर्णीय लोकांच्या घरातही पोहोचले आहे. एका भारतीय महिलेने दैनिक भास्करला सांगितले, की मिलर यांच्या गटाजवळ माझ्या घरचा पत्ता असल्याने मी खूप घाबरलेली आहे. पोस्टरवरील साहित्य खोटे आणि चुकीच्या संदर्भासह आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील वंशवादी ध्रुवीकरणाचा आधीच सामना करत असलेल्या अमेरिकेचे अशा कृत्यांमुळे अाणखी विभाजन होईल. सूत्रांनी सांगितले, की निवडणुकीत पराभव झाला तर ट्रम्प यांच्याप्रमाणे तो स्वीकारायचा नाही, असे रिपब्लिकन उमेदवारांनी ठरवले आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिली होती, त्यामुळे हिंसक घटना घडल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून आशियायी वंशाचे लोक विजयातील अंतर वाढवण्याच्या भूमिकेत जात असल्याचे समोर आले. अॅरिझोना, जॉर्जिया, पेन्सिल्व्हेनियात २०२० प्रमाणे ते डेमोक्रॅटसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. २०२० च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ४७% अधिक आशियायी अमेरिकन्स आणि पॅसिफिक आयलँडर्सनी मतदान केले होते.

सिनेटसाठी भारतीय वंशाचे सहा अमेरिकी स्पर्धेत
कमला हॅरिस यांचे पद २०२० मध्ये रिक्त झाल्यानंतर एकही भारतवंशीय सिनेटमध्ये नाही. प्रमिला जयपाल, अमी बेरा, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, संदीप श्रीवास्तव, श्री ठाणेदार हे सहा भारतवंशीय उमेदवार ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक रिंगणात असतील. यापैकी पाच जण विजयी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...