आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टि्वटर व ट्रम्प वाद:ट्रम्पची धमकी : टि्वटर बंद करू; डोर्सींचे उत्तर: अशीच कारवाई पुढेही करत राहू

कॅलिफोर्नियाएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आमचा उद्देश खरी माहिती देणे : डोर्सी

मायक्रो ब्लॉगिंग साइट टि्वटरने बुधवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन टि्वटचे सत्य तपासण्याचा इशारा दिला होता. यावरून ट्रम्प यांनी टिवटर बंद करण्याची धमकी दिली होती. उत्तरात टि्वटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले, यापुढेही आम्ही सत्यता तपासत राहू. ट्रम्प यांनी गुरुवारी टि्वट केले, कंपनी रूढिवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे. तसे करण्यापूर्वीच आम्ही नियम कठोर करू अथवा टि्वटर बंद करू. कंपनीवर मोठी कारवाईही करण्यात येईल. 

उत्तरात जॅक डोर्सी यांनी टि्वट केले, या निर्णयास मीच जबाबदार आहे. कृपया, माझ्या कर्मचाऱ्यांना या वादात ओढू नका. आम्ही भविष्यात जगभरात होणाऱ्या निवडणुकीत चुकीच्या, दिशाभूल करणारे व वादग्रस्त माहिती असलेला मजकूर उघड करण्याचे काम असेच करत राहणार आहोत. दरम्यान, आमच्याकडून काही चूक झाली तर तीही स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. तर टि्वटरने दुसऱ्यांदा सत्य तपासण्याचे नोटिफिकेशन काढले. टिवटरने ही कारवाई चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिझियानच्या विरोधात केले. लिझियान यांनी कोरोनावर दिशाभूल करणारे टि्वट केले होते.

आमचा उद्देश खरी माहिती देणे : डोर्सी

झुकेरबर्ग म्हणाले, साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म चालवणाऱ्या कंपन्यांनी अशा प्रकरणात मध्यस्थी करू नये. त्यावर डोर्सी यांनी आमचा उद्देश खरी माहिती देण्याचा आहे. त्यामुळे लोकांना योग्य निर्णय घेता येतो, असे म्हटले

बातम्या आणखी आहेत...