आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:ट्रम्पना हवे होते आपल्या बालपणीचे क्वीन्स, पूर्वी जेथे फक्त गोरे लोक राहत ताेआज कृष्णवर्णीयांचा बालेकिल्ला.... या गावाने प्रसिद्ध सुपुत्राला स्वीकारलेच नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
या दुमजली घरात ट्रम्प यांचा जन्म झाला.
  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जन्मगाव, जेथे त्यांचे बालपण गेले त्या न्यूयॉर्कच्या क्वीन्सस्थित जमैका इस्टेटहून...

न्यूयॉर्क (अमेरिका) येथून भास्करसाठी मोहंमद अली
न्यूयॉर्क हे शहर क्वीन्स, मॅनहटन, ब्रुकलिन, ब्रोंक्स आणि स्टेटन आयलँड असे पाच भागांत विभागले आहे. यात क्वीने सर्वात मोठा भाग. मेट्रोने उतरताच जमैका इस्टेटचे आलिशान गेट दिसते. हा येथील सर्वात मोठा निवासी परिसर आहे. ट्रम्प यांच्या वडिलांनी अप्रवासी लोकांच्या कक्षेबाहेर असलेल्या भागांत हा परिसर वसवला. म्हणूनच ट्रम्प बालपणीच्या आठवणी सांगताना म्हणतात, क्वीन्सचा एक मोठा भाग ‘असभ्य’ होता. मात्र, जमैका इस्टेट एक सुरक्षित ठिकाण होते. आज चित्र वेगळे आहे. जमैका राज्य आत-बाहेर जगभरातील अप्रवासी लोकांनी घेरलेले आहे. विशेष म्हणजे या राज्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांना ट्रम्प पसंत नाहीत. यात एक अपवाद म्हणजे ट्रम्प यांचे जुने शेजारी ५७ वर्षीय फ्रेड क्वीन. ते म्हणतात, न्यूयॉर्कमधून श्वेत लोकसंख्या आता संपत चालली आहे. फ्रेड आठवण सांगतात...
ट्रम्प यांचे वडील फ्रेड ब्लू कॅडिलेक लिमोझीनने ऑफिसला जात होते. फ्रेड यांचे जर्मन पिता फ्राईडरिच यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले होते. मात्र, १९१८ मध्ये त्यांचा स्पॅनिश फ्लूमध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर मुलगा फ्रेड याने व्हिक्टोरियन धर्तीचे बंगले बांधणारे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपली ओळख निर्माण केली. हिरवळीने नटलेला हा परिसर दिल्लीची आठवण करून देतो. येथे रस्त्यांवर आता फक्त मर्सिडीझ आणि बीएमडब्ल्यूच दिसतात. काही अंतरावर वेअरहम पॅलेस मार्गावर ट्रम्प यांचे मूळ घर आहे. १४ जून १९४६ रोजी याच घरात ट्रम्प यांचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत ते इथे राहिले. हे घर कुणी विकत घेतले तरी तो फार काळ इथे राहत नाही. मग, ते विकले गेले की त्याची बातमी हाेते. त्या काळात या भागात फक्त गोरे लोक राहत.

१९५० मध्ये १०.५ लाख लोकसंख्येत ९६.५ टक्के गोरे लोक होते. नंतरच्या ५० वर्षांत इथे खूप बदल झाले. रंगभेद, वंशभेदावर कायद्याची बंधने आली. १९६८ मध्ये वांशिक आधारावर येथील घरे विकणे किंवा किरायाने देणे बेकायदा ठरवले गेले. १९७१ मध्ये ट्रम्प कंपनीचे चेअरमन झाले. अशाच वंशवादाच्या प्रकरणात त्यांच्यावर १९७३ मध्ये गुन्हाही दाखल झाला होता. २०१६ मध्ये ट्रम्प रिपब्लिकनचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले तेव्हा क्वीन्समध्ये गोऱ्यांची लोकसंख्या फक्त २५.३ टक्के राहिली होती. तेव्हा ट्रम्प यांना केवळ २१.८ टक्केच मते येथून मिळाली होती. आजही तीच स्थिती आहे. क्वीन्सने ट्रम्पना कधीच स्वीकारले नाही.