आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉर्नस्टार डॅनियल स्टॉर्म्सला ‘हश मनी’ देण्याच्या फौजदारी खटल्यात न्यूयॉर्कच्या मॅनहटन कोर्टातील सुनावणी माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प माेठ्या शाेमध्ये रूपांतरित करू इच्छित आहेत. त्यांच्या सुनावणीमुळे न्यायालय आणि आसपासच्या भागात बंद आणि राजधानी वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिलमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था राहिली. त्यांचे समर्थक मंगळवारी सकाळपासून निदर्शनासाठी जमा झाले होते. न्यूयॉर्क यंग रिपब्लिकन क्लबने कोर्टाजवळ पार्कमध्ये निदर्शने केली.
याआधी ट्रम्प यांनी सुनावणीबाबत वीकेंडला आपल्या रणनीतीकारांसोबत सविस्तर योजना तयार केली. फ्लोरिडात पाम इस्टेट बीचच्या आपल्या मार ए लॅगो निवासस्थानापासून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या रस्त्यात दोन्ही बाजूने समर्थक झेंडे फडकावत होते.
आपला मग शॉट लीक करण्याच्या तयारीत ट्रम्प ट्रम्प कोर्टात फिंगर प्रिंट व मग शॉट(पाटीसोबत आरोपीचा फोटो) देतील. मग शॉट कोर्ट जारी करत नाही. मात्र, स्वत: ट्रम्प ते लीक करतील,असे मानले जाते. त्यांचे प्रवक्ते होगन गिडले म्हणाले, आमच्या रेकॉर्डसाठी सर्वात सुंदर शॉट असेल. न्यायालय यानंतर आरोपपत्र निश्चित करेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.