आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस भारतीय वेळेनुसार २० जानेवारीच्या रात्री १०.३० वाजता शपथ घेतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच दिवशी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता निरोप घेतील. यासोबत त्यांचे समस्यांचे चक्रही सुरू होईल. संसद भवनावरील हल्ल्यासाठी समर्थकांना चिथावणी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत.
चहुबाजूंनी घेरले : डझनभर खटले प्रतीक्षेत, मुलगा म्हणाला-ट्रम्पना बॅन न करणारा सोशल मीडिया मंच असावा
राजकीय : त्रास कधीचाच सुरू झाला
रिपब्लिकन पार्टीतील मातब्बर सहकाऱ्यांनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे. यामुळे त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई सुलभ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्यावर बंदी घातली आहे. ते अद्यापही राष्ट्राध्यक्ष आहेत, मात्र शक्ती गळून गेली आहे. इतिहासकार, कायदा आणि आर्थिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे समस्यांचे चक्र सुरू झाले आहे. पद सोडताच ते घेरले जातील. राष्ट्राध्यक्ष प्रकरणांचे जाणकार डग्लस ब्रिंकले म्हणाले, “शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या इमारतीवरील त्यांचे नाव निघाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण, त्यांचे नाव हेट स्पीचप्रमाणे पाहिले जाईल.’
व्यावसायिक : दानशूर मागे वळले
उद्योग जगत ट्रम्पपासून दूर होत आहे. ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्यासमोर भांडवल समस्या उभी राहू शकते, असा अंदाज आहे. ड्यूश बँक ट्रम्पच्या कंपनीला दोन दशकांपासून लाखो डॉलरचे कर्ज देत आली आहे. बँकेने गेल्या आठवड्यात सर्व संबंध तोडले आहेत. बँकेचे ट्रम्प यांच्यावर २५०० कोटी रु. कर्ज आहे. १९९० मध्ये ट्रम्प दिवाळखोर झाल्यानंतर ड्यूश बँकेनेच त्यांना कर्ज दिले होते. कंपनी दानकर्ते कोका कोला, वॉलमार्ट, मेरियट हॉटेल, जनरल मोटर्स आणि दूरसंचार कंपनी एटीअँडटीने ट्रम्प व पक्षांना निधी देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, जेपी मॉर्गन चेज, सिटीग्रुप, मॉर्गन स्टेनली, गोल्डमन सेशेसारख्या मोठ्या बँकांनी सांगितले की, ते आपल्या राजकीय कृती समितीद्वारे ट्रम्प यांच्या प्रचारासाठी दान देणे बंद करतील. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा गोल्फ कोर्सला आर्थिक मदत दिलेल्या सिग्नेचर बँकेनेही ट्रम्पची दोन खासगी खाती बंद करत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये जवळपास ५.३ डॉलर(सुमारे ४०० रु.) जमा आहेत. अलीकडील घटनेत ट्रम्प एकमेव राष्ट्राध्यक्ष असतील, ज्यांच्यावर रिपब्लिकन पार्टीच्या आजीवन अब्जाधीश दानशूरांना दूर केल्याचा आरोप आहे. अमेरिकी फर्म होम डेपोचे संस्थापक आणि पक्षाचे अब्जाधीश दाते केन लँगून म्हणाले, ट्रम्प यांनी त्यांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत आहे.
यूएस प्रोफेशनल गोल्फर्स असोसिएशननेही (पीजीए) १० जानेवारीला सांगितले की, ते ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ व्यवसाय करणार नाहीत. संघटना मे २०२२ मध्ये न्यू जर्सीच्या गोल्फ क्लबमध्ये चॅम्पियनशिप करणार नाही. ट्रम्प आपल्या गोल्फ कोर्समध्ये ही स्पर्धा करण्यासाठी दीर्घकाळापासून लॉबिंग करत होते. ट्रम्पचे गोल्फ कोर्स त्यांच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा आहे आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनचा एकूण महसूल यातूनच येतो. न्यूयॉर्कचे महापौर डे ब्लासियो यांनी गेल्याच आठवड्यात ट्रम्प ऑर्गनायझेशनसोबत काही वर्षांपासून सुरू व्यवसाय बंद करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे सुमारे १२५ कोटी रुपयांची कमाई होत होती.
विशेष म्हणजे, संसदेवरील हल्ल्याच्या एक दिवस आधी १७० दिग्गज बिझनेस लीडर्स आणि सीईओंनी ट्रम्प यांच्याशी तोडण्याची सुरुवात केली होती. त्यांनी संसदेला लिहिलेल्या पत्रात बायडेनना राष्ट्राध्यक्ष जाहीर करण्याची विनंती केली होती. मात्र, हल्ल्यामुळे हे काम सोपे झाले. दरम्यान, ट्रम्प यांच्या मुलाने वडिलांना अटकाव न करणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवण्याची विनंती टेस्ला व स्पेस एक्स कंपन्यांचे संस्थापक अॅलन मस्क यांच्याकडे केली.
कायदा : स्वत:ला माफ करणे शक्य
व्हाइट हाऊस सोडताच ट्रम्पना राष्ट्राध्यक्षाच्या रूपात मिळणारे कायदेशीर कवच कुचकामी असेल. त्यांच्यावर २१ जानेवारीपासून न्यायालयात गुन्हेगारी खटला चालू शकतो. एवढेच नव्हे तर, ट्रम्पना केंद्रीय व राज्य दोन्ही पातळीवर फौजदारी व दिवाणी आरोपांचा सामना करावा लागेल. ते सध्याच्या चौकशांमुळे एवढे घाबरले आहेत की, स्वत: व मुलांना माफ करण्याचा विचार करत आहेत. वित्तीय फसवणूक व गुन्हेगारी कृत्याची कमीत कमी डझनभर प्रकरणे त्यांची वाट पाहत आहेत. राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ व २०१६ च्या आधीची करचोरी चौकशीही सुरू होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.