आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डेव्हिड ई सँगर
विद्यमान राष्ट्राध्यक्षांएवढीच गाेपनीय माहिती माजी अध्यक्षांना देण्याची अमेरिकेत परंपरा आहे. परंतु इतिहासात पहिल्यांदाच माजी अध्यक्षांना संवेदनशील माहिती मिळवण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे. म्हणजेच माहिती न मिळणारे डाेनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरतील. नूतन अध्यक्ष बायडेन यांनी या गाेष्टीची पुष्टी केली आहे. बायडेन म्हणाले, ट्रम्प यांचे वर्तन त्रस्त करणारे आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. बायडेन यांनी ट्रम्प यांच्याविराेधातील हे वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान केले. त्याचबराेबर काही कडवट टीकाही केली. ते म्हणाले, अमेरिकेत संवेदनशील माहिती माजी अध्यक्षांना देण्याची परंपरा आहे, हे खरे आहे. परंतु या वेळी तिचे पालन केले जाणार नाही. त्यांनी मागणी केली तरी आम्ही ती देऊ शकणार नाही.
गाेपनीय माहिती मिळवण्याची आता ट्रम्प यांना काही गरज असावी, असे मला तरी वाटत नाही. यातून काय हाेणार आहे? ते या माहितीचे काय करणार आहेत? त्यांचा बाेलघेवडेपणा हा धाेका ठरताेच ना? त्यांनी अचानक काही जाहीर केले तर? असे प्रश्न बायडेन यांनी विचारले. राजकीय तज्ज्ञांना मात्र त्यांचे हे वक्तव्य केवळ औपचारिकता वाटत आहे. कारण ट्रम्प यांनी अद्यापही काेणत्याही ब्रीफिंगसाठी विनंती केलेली नाही. व्हाइट हाऊसमध्ये असताना ते ब्रीफिंगकडे बघतही नव्हते. खरे तर परंपरा म्हणून दरराेज त्यांनी हे करायला हवे हाेते. मात्र आठवड्यात ते केवळ दाेन-तीन वेळा रिपाेर्ट्स पाहत हाेते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.