आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trump Will Surrender Today In New York Court; Security Increased As Trump Supporters, Opponents Gather In Georgia In The Evening

न्यूयॉर्क कोर्टात आज शरण येणार ट्रम्प:सायंकाळी जॉर्जियात सभा, ट्रम्प समर्थक, विरोधकांमुळे सुरक्षा वाढवली

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प पॉर्नस्टार डॅनियल स्टार्म्सला पैसे दिल्या प्रकरणी मंगळवारी न्यूयॉर्क कोर्टात शरण येतील. जामीन मिळण्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, ते सायंकाळी फ्लोरिडाला येऊन आपल्या पाम बीच इस्टेट मार ए लॅगोवर समर्थकांना संबोधित करतील. २३४ वर्षांत प्रथमच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फौजदारी प्रकरणाचा सामना करावा लागत आहे. या निमित्त ट्रम्प समर्थकांची संतप्त भावना पाहता न्यूयॉर्क न्यायालयात त्यांच्या सुनावणीदरम्यान आसपासच्या भागात लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. न्यायालय परिसरासोबत ट्रम्प टॉवरच्या आसपास अडथळे उभारले आहेत. कोर्टातील उर्वरित खटले स्थगित केले आहेत. न्यूयॉर्कसोबत वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिल आणि अन्य शहरांतही सुरक्षा वाढवली आहे.