आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेरेमी पीटर्स, मायकेल ग्रेनबाउम
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कंझर्व्हेटिव्ह मीडियाचा पुरेपूर वापर करत आहेत. म्हणजे त्यांना कुणी कठीण प्रश्न विचारू नये. जो कठीण प्रश्न विचारतो त्या पत्रकाराला लांब ठेवले जात आहे. कारण कठीण प्रश्न त्यांच्या अडचणी वाढवतील. त्यांना बचावात्मक नव्हे तर आक्रमक धोरण ठेवायचे आहे. अगदी तसेच जसे त्यांनी पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये केले होते. यातून त्यांना मोहात अडकू शकणाऱ्या मतदारांना संदेश द्यायचा आहे. निवडणुकीला अवघे तीन आठवडे राहिल्याने त्यांच्यासाठी हे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आणि कथितरीत्या बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी कॅमेऱ्यासमोर पहिली मुलाखत दिली. या वेळी ट्रम्प यांना याबाबत तक्रार आणि दु:ख होते की, यंदा त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवडण्यात आले नाही. यासाठी त्यांनी त्यांना कठीण प्रश्न करणाऱ्या मीडियाला दोषी ठरवले. ट्रम्प म्हणाले, मी कितीही चांगले काम केले तर मीडिया त्याला कव्हरेज देत नाही. या वेळी त्यांना प्रश्न करण्यात आला की, तुमचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे का? यावर ते म्हणाले, मला माहिती आहे माझी तब्येत कशी आहे आणि केव्हा चांगली असते. हा प्रश्न हॅनिटीतील कार्यक्रमात विचारण्यात आला होता. सुमारे ५० लाख लोकांनी तो पाहिला.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात फॉक्स न्यूजला सुमारे १०० मुलाखती दिल्या, तर इतरांना खूपच कमी. डॉ. सीगल यांना त्यांनी जी मुलाखत दिली तिचेही थेट प्रसारण करण्यात आले नाही. सीगल यांनी स्टुडिओतून प्रश्न विचारले. उत्तरे व्हाइट हाऊसमध्ये लावण्यात आलेल्या रिमोट कंट्रोल्ड कॅमेऱ्याद्वारे मिळाली. डॉ. सीगल मॅनहटनमध्ये इंटर्नल मेडिसिनचे तज्ज्ञ आहेत.
ट्रम्प यांना माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे
डोनाल्ड ट्रम्प यांना मीडियाचा वापर करता येतो. विशेषत: त्या मीडियाचा जे त्यांच्या बाजूने आहेत. त्यांना मतदारांच्या विशेष गटापर्यंत जायचे आहे. शनिवारी ट्रम्प यांनी लिम्बॉग यांना जी रेडिओ मुलाखत दिली त्यातील इशाऱ्यातून स्पष्ट दिसते. ट्रम्प व लिम्बॉर्ग दोघांना स्पष्ट करायचे होते की, व्हाइट हाऊसमध्ये राहण्यासाठी ट्रम्प सर्वात योग्य व्यक्ती आहेत. ट्रम्प यांनी बायडेन, हिलरी क्लिंटन व एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमे यांचे म्हणणे पूर्णपणे फेटाळून लावले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.