आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या घरी न्यूक्लिअर पेपर्ससाठी छापेमारी:अ‍ॅटर्नी जनरलनी स्वतः साइन केला सर्च वॉरंट, FBI ला रेडमध्ये आढळले 12 बॉक्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी एफबीआयने टाकलेल्या छापेमारीप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, न्यूक्लिअर डॉक्युमेंट्स व अन्य महत्त्वाची सामग्री जप्त करण्यासाठी ही झाडाझडती करण्यात आली होती. त्यात 12 संशयास्पद बॉक्स जप्त करण्यात आले. एफबीआयच्या एजंट्सना न्यूक्लिअर रेकॉर्ड सापडले किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान पॉम हाऊस व रिसॉर्ट मार ए लीगोवर छापेमारी केली होती. ट्रम्प यांच्या 2 विश्वासूंनी ही छापेमारी विनानोटीस करण्यात आल्याचा आरोप केला आहे. छापेमारीवेळी ट्रम्प बाहेर होते. ही संधी साधून ही छापेमारी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

हे छायाचित्र 9 ऑगस्टचा आहे. एफबीआय एजंट्सनी ट्रम्प यांचे घर तपासासाठी ताब्यात घेतले होते. रिसॉर्ट मार ए लीगोच्या प्रत्येक गेटवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली होती.
हे छायाचित्र 9 ऑगस्टचा आहे. एफबीआय एजंट्सनी ट्रम्प यांचे घर तपासासाठी ताब्यात घेतले होते. रिसॉर्ट मार ए लीगोच्या प्रत्येक गेटवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

अ‍ॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषधेत या छाप्याची त्रोटक माहिती दिली. तसेच छापेमारीनंतर एफबीआयवर होणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला. त्यांनी छाप्याचे कारण सांगितले नाही. पण या छाप्याला परवानगी आपण स्वतः दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचे हे विधान अमेरिकन न्याय विभागाच्या सर्च वॉरंट सार्वजनिक करण्याच्या फैसल्यानंतर आले आहे. या फैसल्याद्वारे ही छापेमारी का करण्यात आली हे स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. कारण, ट्रम्प यांच्यावरील छापेमारीमुळे अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

ट्रम्प यांच्यावर व्हाइट हाऊसमधून महत्वपूर्ण दस्तावेज नेल्याचा आरोप

ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना आपल्यासोबत अनेक महत्वपूर्ण दस्तावेज नेल्याचा आरोप आहे. त्यावेळी 15 मोठे बॉक्समधून हे दस्तावेज मार ए लीगोला नेण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणांनी ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती. पण आतापर्यंत एफबीआयने या आरोपांची पुष्टी केली नाही.

टॉयलेटमध्ये फ्लश करत होते दस्तावेज

अमेरिकेच्या अध्यक्षपदी असताना ट्रम्प अनेक महत्वपूर्ण दस्तावेज टॉयलेटमध्ये फ्लश करत असल्याचा आरोप झाला होता. ट्रम्प यांनी एवढे दस्तावेज फ्लश केले की यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेटच चोकअप झाले. नॅशनल आर्काइव्हने माजी राष्ट्राध्यक्षांच्या दस्तावेज फाडण्याच्या सवयीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे छायाचित्र जानेवारी 2021 चे आहे. व्हाइट हाऊस सोडताना ट्रम्प 15 बॉक्समधून आपल्यासोबत अनेक दस्तावेज घेऊन गेले होते.
हे छायाचित्र जानेवारी 2021 चे आहे. व्हाइट हाऊस सोडताना ट्रम्प 15 बॉक्समधून आपल्यासोबत अनेक दस्तावेज घेऊन गेले होते.

छापेमारीनंतर ट्रम्प म्हणाले -हा देशासाठी काळा दिवस

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत असे केव्हाच घडले नाही. तपास यंत्रणांना सहकार्य केल्यानंतरही अशी कारवाई केली जात आहे. न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर केला जात आहे. हा कट्टर लेफ्ट डेमोक्रॅट्सचा हल्ला आहे. मी 2024 ची निवडणूक लढू नये, अशी त्यांची इच्छा आहे, असे ट्रम्प या छापेमारीनंतर म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...