आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका :ट्रम्प यांच्या प्रचार माेहिमेत विशीतील तरुण वर्गाचा अडथळा, साेशल मीडियावर अभियान सुरू 

वाॅशिंग्टन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वेळी ट्रम्प यांच्या पाठीशी 37 टक्के तरुण

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचार माेहिमेत विशीतील समुदायाचा माेठा अडथळा ठरू शकताे. अमेरिकेत ही लाेकसंख्या सुमारे ३.३० काेटी आहे. अमेरिकेसह पश्चिमेकडील देशात तरुणांना झूमर्स किंवा जनरेशन झेड असे संबाेधले जाते. 

ट्रम्प यांच्या पहिल्याच सभेत समर्थकांची संख्या कमी हाेती. त्यामागे ही नवी पिढी कारणीभूत असल्याचे मानले जाते. ही पिढी टिकटाॅक युजर्स व काेरियन पाॅप म्युझिकचे चाहती आहे. ती साेशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याविराेधात अभियान चालवू लागली आहे. ट्रम्प यांच्या सभेची तिकिटे खरेदी करा, परंतु सभेला हजेरी लावू नका.

अशा तरुणांनी तिकिटांची खरेदी केली नाही तरी फार काही फरक पडत नाही. माध्यमे तसेच निदर्शकांच्या गर्दीमुळे समर्थक रॅलीला येत नसावेत, असे ट्रम्प यांच्या टीमचे म्हणणे आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या एका अहवालानुसार अमेरिकेत ६० टक्के झूमर्स कृष्णवर्णीय आहेत. एका अभ्यासानुसार ६० टक्के झूमर्स साेशल मीडियाकडे बातम्यांच्या आधी स्राेत म्हणून पाहतात. काही देशांत झूमर्स आधीच्या पिढीच्या तुलनेत उच्च शिक्षणात जास्त रस दाखवत नाहीत. त्यांना कमी वयात आंदाेलक व्हायचे आहे. 


गेल्या वेळी ट्रम्प यांच्या पाठीशी ३७ टक्के तरुण

अमेरिकेचे सर्वात तरुण खासदार अलेक्झांड्रिया काॅर्टेज (३०) यांंनीही झूमर्सचे काैतुक केले आहे. अलेक्झांड्रिया या ट्रम्पविराेधी डेमाेक्रॅटिक पार्टीच्या खासदार आहेत. ट्रम्प यांची प्रचार माेहीम झूमर्समुळे बुचकळ्यात पडली आहे. वास्तविक २०१६ च्या निवडणुकीत केवळ ३७ टक्के तरुणांनी ट्रम्प यांना मत दिले हाेते, तर तप्रतिस्पर्धी हिलरी यांना ५५ टक्के कौल होता. 

0