आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका:ट्रम्प यांचा चीनवर प्रचारकी डाव,म्हणाले-काेराेना म्हणजे ‘कुंग फ्लू’

वाॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका बालेकिल्ला आेक्लाहाेमामधील निवडणूक प्रचार माेहिमेत ट्रम्प यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement

राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी आपला बालेकिल्ला आेक्लाहाेमामधून निवडणूक प्रचार माेहिमेची सुरुवात केली. पहिल्या रॅलीत ट्रम्प यांनी चीनला निवडणुकीतील मुद्दा बनवले. काेराेनाच्या आजाराला अनेक नावे दिली जाऊ शकतात. आपण त्याला ‘कुंग फ्लू’ असे म्हणू शकताे. चीनचे पारंपरिक मार्शल आर्ट ‘कुंग फू’च्या धर्तीवर ट्रम्प यांनी हा टाेला लगावला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात प्रतिस्पर्धी डेमाेक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जाे. बायडेन यांच्यावरही निशाणा साधला. बायडेन कट्टरवादी डाव्या गाेटातील हतबल कळसूत्री बाहुुला ठरले आहेत. डावे लाेक आम्हाला राेखण्यासाठी दरराेज हिंसाचार, लूटमार करत आहेत. बायडेन यांनी मिनियापाेलिसमध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी दंगलखाेरांना पैसा उपलब्ध करून दिला. बायडेन यांच्या माेहिमेशी संबंधित लाेकांनी ही बाब कबूल केली आहे. डाव्यांची गर्दी स्मारके, पुतळ्यांना उखडून आपला इतिहास नष्ट करू पाहत आहेत.

वादंग : ट्रम्प यांनी वकिलांचा तपास करणाऱ्या सरकारी वकिलास हटवले
ट्रम्प यांनी मॅनहॅटनचे सरकारी वकील जाॅफ्री एस. बर्मन यांना पदावरून हटवले आहे. त्यामुळे देशाचे विधी क्षेत्रातील सर्वाेच्च अधिकारी व अॅटर्नी जनरल विल्यम बर यांच्यात तणाव वाढला आहे. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित चाैकशी बर्मन यांची टीम करत हाेते. त्यात ट्रम्प यांचे खासगी वकील रुडी गियुलियानी व मायकल काेहेन यांचा समावेश आहे. रुडी व काेहेन यांच्या व्यावसायिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार माेहिमेवरून संसदेशी खाेटे बाेलल्यावरून काेहेन यांना तीन वर्षांची शिक्षा आधीच झाली आहे. ट्रम्प यांच्या सांगण्यावरूनच अनेक लाेकांना पैसे दिले हाेते, असा दावा काेहेन यांचा होता.

स्टेडियम लाइव्ह : १०० मिनिटांचे भाषण, डिस्टन्सिंगची एेशीतैशी
ट्रम्प यांनी आेक्लाहाेमामधील टुलसा शहरातील मैदानात घेतलेल्या या सभेत १०० मिनिटांचे भाषण केले. स्टेडियममध्ये १९ हजार आसने आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांच्या गर्दीने हे मैदान भरलेले हाेते. बहुतांश लाेकांनी मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे देखील पालन केल्याचे दिसले नाही. खबरदारी म्हणून पाेलिसांनी मैदानाच्या प्रवेशद्वारावर सर्वांचे तापमान माेजून आत साेडले. सभेपूर्वी ट्रम्प यांच्या माेहिमेशी संबंधित सहा लाेक काेराेनाबाधित आढळून आले. रॅलीत एक तरुण बेशुद्ध झाला. ट्रम्प यांनी भाषण थांबवून डाॅक्टरांना बाेलावण्यास सांगितले.

Advertisement
0