आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील घटलेल्या मागणीबाबत माजी राष्ट्राध्यक्षा डाेनाल्ड ट्रम्प यांनी अजब तर्क लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटलेल्या मागणीचे कारण, स्थलांतरितांची वाढती लोकसंख्या हे आहे. यामुळे मूळ अमेरिकी लोकांमध्ये वस्तू वापर कमी झाला आहे. मागणी वाढवायची असेल आणि अमेरिकेला पुन्हा महाशक्ती बनवायचे असेल तर अमेरिकेच्या लोकांनी जास्त अपत्ये जन्माला घातली पाहिजेत,असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. सध्या अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३.१९ कोटी आहे. या शतकाच्या सुरुवातीस ही २८.२२ कोटी होती. म्हणजे, सुमारे १७% ची वाढ. दुसरीकडे, रशियाही लोकसंख्या वाढण्यावरही भर दिला जात आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २०२५ पर्यंत अर्धा टक्का जन्मदर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ट्रम्प यांच्याकडून जास्त संतती जन्माला घालण्यासाठी दिल्या जाणाऱ्या जोरामागे तज्ज्ञ अनेक कारणे देत आहेत. प्रथम, हा की १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेल्या(बेबी बूमर्स) अमेरिकेतील तीन राष्ट्राध्यक्षांमध्ये ट्रम्प यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय दोन अन्य बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुशही आहेत. त्या काळात जन्मलेले सर्वात कमी वयाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. ट्रम्प यांचा मुले असण्याचा विचार त्यांच्या पीढीमुळे आहे. जेव्हा ट्रम्प जन्मले हाेते, तेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त अपत्यप्राप्ती करण्यासाठी भर दिला जात होता. ट्रम्प यांचा विचार त्याच्याशी सुसंगत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०२३ चा जन्मदर कायम राहिल्यास २०४१ पर्यंत अमेरिकेत १८ कोटी मुले जन्म घेतील.
युद्ध, कोरोनामुळे रशियाची स्थिती वाईट रशियासाठी लोकसंख्या वाढ संकटाची स्थिती निर्माण करू शकतो. गेल्या तीन वर्षांत रशिया युद्ध, आजार आणि स्थलांतरामुळे २० लाखांहून जास्त लाेकसंख्या कमी झाली आहे. याचे कारण आहे की, युद्धाच्या आघाडीवर पुरुष तैनात किंवा मारले गेले आहेत. किंवा त्यांनी रशिया सोडले आहे. सध्या पुरुष आणि महिलांच्या संख्येत १ कोटींचे अंतर आहे. तसे पाहता युद्धामुळे होणारे नुकसान, आजारपण आणि ज्येष्ठांची लोकसंख्या ओझे टाकत आहे. हे रशियासाठी घातक स्थिती तयार करत आहे. रशियातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या २०१० ते २०२१ दरम्यान ५४ लाख घटली आहे.
{लोकसंख्येतील घसरणीचा सामना करणारे बहुतांश देश मोठी सामाजिक उलथापालथ टाळण्यात यशस्वी राहिले आहेत. रशियाची लोकसंख्या असामान्य पद्धतीने वेगाने घसरत आहे आणि शतकातील मध्यापर्यंत १३ कोटीत मर्यादीत राहू शकते.
{वॉशिंग्टनमधील लोकसांख्यिकी तज्ज्ञ निकोलस अॅबरस्टेड यांच्यानुसार, रशियात मृत्यूदर विकसनशील देशांएवढा आहे. शिक्षण विकसित देशांसारखे आहे. शिकलेल्या लोकांचे स्थलांतर त्रासदायक विषय आहे. यामुळे विकास कठीण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.