आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे शत्रू कोण?:ट्रम्प यांचे समर्थक अमेरिकेचे शत्रू; बायडेन यांचा घणाघात, मध्यावधी देशाच्या आत्म्यासाठी लढाई

राजकारणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ट्रम्प यांचे रिपब्लिकन पार्टीचे समर्थक देशात कट्टरवाद वाढवू लागले आहेत. त्यांचे समर्थक अमेरिकेच्या लोकशाही मूल्यांवर प्रहार करत असल्याचा आरोप बायडेन यांनी केला. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली मध्यावधी निवडणूक म्हणजे अमेरिकेच्या आत्म्यासाठीची लढाई आहे, असे बायडेन यांनी सांगितले. इंडिपेंडन्स हॉलमधील आपल्या २४ मिनिटांच्या भाषणात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. लोकशाहीच्या संरक्षणासाठी ट्रम्प व त्यांच्या समर्थकांच्या विचारांचा या निवडणुकीत पराभव करण्याची गरज आहे. ट्रम्प व मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) रिपब्लिकन कट्टरवादी गटाचे प्रतिनिधित्व करतात. ही बाब प्रजासत्ताकाच्या पायाला डळमळीत करणारी ठरू शकते. मागा समर्थक देशाला पुन्हा मागे घेऊन जाऊ इच्छितात. निवडणूक, गोपनीयता, गर्भनिरोधकाचा अधिकार नसणे इत्यादी गोष्टी असलेली अमेरिका त्यांना घडवायची आहे. एवढेच नव्हे तर तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीशी विवाह करण्याचादेखील तुम्हाला अधिकार नसेल. ट्रम्प आपल्या कार्यकाळानंतर निवडणूक घेऊ इच्छित नव्हते. ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेच्या प्रतिमेला परदेशात बदनाम करून टाकले आहे.

िमडटर्ममध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसारखे वातावरण नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळण्याची ही अमेरिकेतील पहिलीच वेळ आहे. डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन परस्परांवर हल्लाबोल करू लागले आहेत. हे पाहून अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक सुरू असल्यासारखे वाटू लागले आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन बायडेन यांना दोन वर्षेही झालेली नाहीत.

पालिन अलास्कात पराभूत अलास्काच्या माजी गव्हर्नर सारा पालिन अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सारा ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी मानल्या जातात. रिपब्लिकन काँग्रेसचे डॉन यंग यांचे मार्चमध्ये निधन झाल्यानंतर सारा राजकीय मैदान तयार करू लागल्या. त्यांना प्रचंड विरोध असतानाही ट्रम्प यांनी त्यांना रिपब्लिकन उमेदवारी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...