आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्किये-सीरियात 12 तासात भूकंपाचे 3 मोठे धक्के:दोन्ही देशांमध्ये 2300 हून अधिक लोकांचा मृत्यू, शेकडो मलब्यात दबले, भारताकडून मदतीचा हात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींमध्ये अनेकजण दबलेत. यात मुलांचाही समावेश आहे. अनेकांना बचाव पथकाने वाचवले आहे.

मध्यपूर्वेतील तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन व इस्रायल हे 4 देश सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये व त्याच्या लगतच्या सीरियात या भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे तुर्कियेत 1014 जणांचा मृत्यू, तर 5,385 जण जखमी झालेत.

तुर्किश मीडियाच्या वृत्तानुसार, भूकंपाचे 2 मोठे धक्के जाणवले. पहिला धक्का स्थानिक प्रमाणवेळेनुसार, पहाटे 4 वा. (7.7) व दुसरा सकाळी 10 च्या सुमारास आला. दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 7.6 नोंदवण्यात आली. याशिवाय 78 आफ्टर शॉक्स नोंदवण्यात आले. त्यांची तीव्रता 6.7 ते 6.5 होती.

या भूकंपामुळे सीरियातही 585 जण ठार, तर 1500 हून अधिक जण जखमी झालेत. दोन्ही देशांतील बळींचा आकडा 1600 वर पोहोचल्याचा दावा केला जात आहे. लेबनान व इस्त्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पण सुदैवाने तिथे कोणतेही नुकसान झाले नाही.

हे फुटेज तुर्कियेच्या उर्फा शहराचे आहे. येथे भूकंपामुळे एक 6 मजली अशी क्षणार्धात कोसळली.
हे फुटेज तुर्कियेच्या उर्फा शहराचे आहे. येथे भूकंपामुळे एक 6 मजली अशी क्षणार्धात कोसळली.

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेचे गझियानटेप शहर

भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. त्याचा परिणामही दिसून येत आहे. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचं वृत्त आहे.

पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कियेतील भूकंपात प्राण गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले -140 कोटी भारतीयांच्या भावना तुर्कियेसोबत आहेत. भारत सरकार मदतीसाठी मदत सामग्रीसह NDRF व वैद्यकीय बचाव पथक तुर्कियेला पाठवत आहे.

18 आफ्टरशॉक आले, 7 तीव्रतेचे 5 पेक्षा जास्त
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर 18 आफ्टरशॉक नोंदवले गेले. त्यांची तीव्रता 4 पेक्षा जास्त होती. पहिल्या भूकंपानंतर झालेल्या 7 मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता 5 पेक्षा जास्त होती. पुढील काही तास आणि दिवस आफ्टरशॉक जाणवतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नकाशावरून समजून घ्या.... भूकंप कुठे झाला

सलग 3 भूकंप

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे 24 किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला. 11 मिनिटांनंतर 6.7 रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून ९.९ किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर १९ मिनिटांनी ५.६ रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. त्यामुळे अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

सर्वाधिक प्रभावित शहरे:
अंकारा, गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरासह 10 शहरे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. येथे 250 हून अधिक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनेक भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

100 वर्षांनंतर असा भूकंप, 10 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो
दुसरीकडे, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 'तुर्कीयेमध्ये मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे. ही संख्या 10 हजारांपर्यंत पोहोचू शकते.

USGS ने यामागे असा तर्क केला की, 1939 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, 1999 मध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 845 लोकांचा मृत्यू झाला होता.

पाहा भूकंपानंतरची छायाचित्रे...

हे छायाचित्र तुर्कियेच्या गॅझियाटेप शहरातील आहे. येथे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. भूकंप झाला तेव्हा लोक आपापल्या घरात झोपले होते.
हे छायाचित्र तुर्कियेच्या गॅझियाटेप शहरातील आहे. येथे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. भूकंप झाला तेव्हा लोक आपापल्या घरात झोपले होते.
या फोटोमध्ये भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली इमारत दिसत आहे. येथील ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
या फोटोमध्ये भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेली इमारत दिसत आहे. येथील ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
हे छायाचित्र एरबिल शहराचे आहे. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले.
हे छायाचित्र एरबिल शहराचे आहे. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसले.
गझियाटेप शहरात भूकंपामुळे अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला.
गझियाटेप शहरात भूकंपामुळे अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला.

नोव्हेंबरमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता
तुर्कियेमध्ये नोव्हेंबर महिन्यात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के इतके जोरदार होते की राजधानी अंकारा, इस्तंबूल आणि आसपासच्या परिसरात जाणवले. आरोग्य मंत्री फहरतीन कोका म्हणाले - 22 जण जखमी झाले होते. भूकंपाच्या भीतीने या लोकांनी उंच इमारतीवरून उद्या मारल्या.

1999 मध्ये झालेल्या भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता
न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दुजसे प्रांतातील गोलकाया येथे होता. हे शहर इस्तंबूलपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. याच शहरात १९९९ मध्ये ७.२ रिश्टर स्केलचा सर्वात धोकादायक भूकंप झाला होता, ज्यामध्ये ८४५ लोकांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...