आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कियेत सोमवारी सकाळी 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. त्यात आतापर्यंत 912 जणांचा बळी गेला आहे. तुर्कियेच्या बाहेर सीरिया, लेबनान व इस्त्रायलमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण पाहूया तुर्कियेत एवढे भयंकर भूंकप का होतात व हा भूंकप 1939 नंतरचा सर्वात भयंकर भूकंप का आहे?
3 मोठ्या टेक्टोनिक प्लेट्समध्ये अडकला तुर्किये
तुर्कियेत एवढा मोठा भूकंप का झाला, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रव लाव्हा आहे. या प्लेट्स सातत्याने तरंगत राहतात व अनेकदा एकमेकांवर आदळतात.
एकमेकांना धडकल्यामुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात. जेव्हा जास्त दाब पडतो तेव्हा या प्लेट्स तुटण्यास सुरुवात होते. त्या स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते व या डिस्टर्बंसनंतर भूकंप होतो.
तुर्कियेचा बहुतांश भाग अनाटोलियन टेक्टोनिक प्लेटवर आहे. ही प्लेट युरेशियन, आफ्रिकन व अरेबियन प्लेट्समध्ये अडकलेली आहे. आफ्रिकन व अरेबियन प्लेट्स हलल्यानंतर तुक्रिये सँडविचसारखे अडकते. त्यामुळे पृथ्वीच्या आतून ऊर्जा बाहेर पडते व भूकंप होतात. सोमवारी तुर्कियेत झालेला भूकंप उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर झाला.
तुर्कियेत अधिक भूकंप का होतात हे आता आपल्याला समजले आहे. पण हा भूकंप अधिक धोकादायक का आहे हे जाणून घेण्यासाठी भूकंपाचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे…
पृथ्वीच्या पोटात अनेक मैल अंतरावर टेक्टोनिक प्लेट्स फिरतात तेव्हा शेकडो अणुबॉम्बच्या बरोबरीची ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा 2 टप्प्यांत 4 प्रकारच्या लहरींद्वारे पृथ्वीच्या इतर भागांत पसरून विध्वंस करते...
पहिली स्टेप - भू-लहरी (ग्राउंड वेव्ह): भूकंपाच्या केंद्रापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ऊर्जा 2 प्रकारच्या लहरींद्वारे पोहोचते. P वेव्ह व S वेव्ह. P वेव्ह स्प्रिंगसारखी असते. त्यात एक रिंग आपल्यापुढील रिंगवर दाब टाकते. त्याची वारंवारता व वेग जास्त असतो. याचा अर्थ ते ऊर्जेला तत्काळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाठवते. S लाटा इंग्रजी वर्णमाला S च्या आकारात वाढतात. S तरंगाचा वेग P लहरीपेक्षा कमी असतो.
दुसरी स्टेप - सरफेस वेव्ह: पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर भूकंपातून बाहेर पडणारी प्रचंड ऊर्जा 2 प्रकारे त्या बिंदूच्या पलीकडे पसरते. एक - रेली वेव्हच्या स्वरूपात व दोन लव्ह वेव्हच्या स्वरूपात.
रेली वेव्ह समुद्रातील लाटांप्रमाणे पुढे सरकतात. त्यात एखाद्या शक्तिशाली वाहनाच्या चाकाप्रमाणे त्याच्याभोवती ऊर्जा बाहेर पडते. ही लाट शांत पाण्यात दगड टाकल्यानंतर निर्माण होणाऱ्या लाटेसारखी असते. ती तशीच पुढे सरकते. ती जमीन नांगरल्यासारखे पुढे सरकते. यामुळे भयंकर विनाश होतो. लव्ह लाट सापासारखी नागमोडी चालते. त्यामुळे त्या तुलनेनत कमी विनाश होतो. तुर्कियेत याच रेलीच्या लाटेने विध्वंस माजवला आहे.
7.8 तीव्रतेचा भूकंप किती स्ट्राँग असतो?
मेलबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक व भूकंप शास्त्रज्ञ जानुका अट्टानायके यांच्या मते, 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप अत्यंत धोकादायक मानला जातो. याचे कारण म्हणजे त्यातून सुमारे 32 पेटाजूल्स ऊर्जा उत्सर्जित होते. म्हणजे त्यातून न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहराला सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ वीज मिळू शकते. जानुका म्हणाले की, 5.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या तुलनेत 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप 708 पट अधिक शक्तिशाली असतो.
फिलीपीन इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीचे संचालक रेनाटो सॉलिडम यांच्या मते, हिरोशिमामधील अणुहल्ल्यापेक्षा 7 तीव्रतेचा भूकंप 32 पट जास्त ऊर्जा सोडतो. तथापि, या प्रकारच्या भूकंपामुळे होणारे नुकसान 2 गोष्टींवर अवलंबून असते. एक -ज्या ठिकाणी हादरे बसतात तिथे लोकसंख्येची घनता किती आहे व दोन- भूकंपाचे केंद्र किती खोलवर आहे.
यापूर्वी 2013 साली पाकिस्तानात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यात 825 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर 2 वर्षांनी 2015 मध्ये नेपाळमध्ये अशाच तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यात सुमारे 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
84 वर्षांपूर्वी याच तीव्रतेच्या भूकंपात 30 हजार जण मारले गेले होते
तुर्कियेत सोमवारी झालेला भूकंप 84 वर्षांपूर्वी म्हणजेच 1939 मध्ये झालेल्या भूकंपाएवढाच विनाशकारी आहे. इम्पीरियल कॉलेज लंडनमधील भूकंपविज्ञान संशोधक स्टीफन हिक्स यांच्या मते, ' उत्तर-पूर्व तुर्कियेत डिसेंबर 1939 मध्ये सोमवारसारखाच 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात सुमारे 30 हजार लोक मारले गेले होते.
तुर्कियेतील भूकंपाच्या इतर बातम्या वाचा..
तुर्कियेत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती:झोपतेच अनेक कुटुंबावर काळाचा घाला; जखमींचा ढिगाऱ्यांतून टाहो-वाचवा; PHOTOS
तुर्किये आणि सीरियाला सोमवारी सकाळी 7.8 तीव्रतेच्या भूकंपाने हादरवून सोडल्यानंतर आतापर्यंत 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्के लेबनॉन आणि इस्रायलमध्येही जाणवले. भूकंप झाला. तेव्हा तुर्किये आणि सीरियातील लोक झोपेत होते. यानंतर सुमारे 66 आफ्टरशॉक आले. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या. हा ढिगारा रस्त्यावर पडल्याने अनेक वाहने त्याच्याखाली दबली गेली. तुर्किये आणि सीरियामध्ये भूकंपामुळे झालेल्या विनाशानंतर आता बचावकार्य सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
मध्य पूर्वेत 7.8 तीव्रतेचा भूकंप:आप्तस्वकियांना गमावणाऱ्या कुटुंबीयांचा टाहो, पाहा भूकंपाचे हृदयविदारक PHOTOS
मध्य पूर्वेतील तुर्कियेसह सीरिया, लेबनान व इस्त्रायल या 4 देशांना सोमवारी पहाटे भूकंपांचे जोरदार धक्के बसले. हा भूकंप 7.8 रिश्टर स्केलचा होता. त्यात पहाटेच्या साखरझोपेत असणाऱ्या शेकडो जणांचा बळी गेला. यात तुर्कियेतील 76, तर सीरियातील 237 जणांचा समावेश आहे. याशिवाय लेबनान व इस्त्रायलमध्येही अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.