आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैवी चमत्कार:भूकंपाच्या 91 तासानंतर 4 वर्षीय चिमुकलीला ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

अंकाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीमध्ये भूकंपाच्या 91 तासानंतर 4 वर्षीय मुलीला इमारतीच्या ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. ही इमारत भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या इजमिर शहरातील होती. इजमिरचे मेयर ट्यून्क सोयेर म्हणाले की, 91 तासानंतर आम्ही एक चमत्कार होताना पाहिला.

रेस्क्यू टीमला पाहून आयदाने हात हलवला

ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर काढलेल्या चिमुकलीचे नाव आयदा आहे. हे तुर्कीमधील एक लोकप्रिय नाव आहे. आयदाचा अर्थ होतो, 'चंद्रावरुन आलेली.' ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर आयदाला थर्मल ब्लँकेटमधून गुंडाळून हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. ढिगाऱ्यातून बाहेर आल्यानंतर रेस्क्यू टीमला पाहून आयदाने हात हलवला. यापूर्वी याच शहरातील एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून 3 वर्षीय मुलीला सुखरुप बाहेर काढले होते.

मृतांचा आकडा 100 च्या पुढे

तुर्कीमध्ये 30 ऑक्टोबरला 7 रिश्टर स्केल तीवर्तेचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. यातील मृतांचा आकडा 102 झाला आहे, तर 1 हजारांपेक्षा जास्त लोक जखमी आहेत. अजूनही बचाव कार्य सुरू आहे.