मध्य पूर्वेत 7.8 तीव्रतेचा भूकंप:आप्तस्वकियांना गमावणाऱ्या कुटुंबीयांचा टाहो, पाहा भूकंपाचे हृदयविदारक PHOTOS
मध्य पूर्वेतील तुर्कियेसह सीरिया, लेबनान व इस्त्रायल या 4 देशांना सोमवारी पहाटे भूकंपांचे जोरदार धक्के बसले. हा भूकंप 7.8 रिश्टर स्केलचा होता. त्यात पहाटेच्या साखरझोपेत असणाऱ्या शेकडो जणांचा बळी गेला. यात तुर्कियेतील 76, तर सीरियातील 237 जणांचा समावेश आहे. याशिवाय लेबनान व इस्त्रायलमध्येही अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
या भूकंपानंतर अनेक ठिकाणी हृदयविदारक चित्र दिसून येत आहे. अनेकजण आपल्या आप्तस्वकियांच्या मृत्यूमुळे टाहो फोडताना दिसून येत आहेत. अनेकांच्या पोटच्या गोळे या भूकंपाने हिरावून घेतलेत.
तुम्हीही पाहा 4 देशांतील या भूकंपाचे काही निवडक फोटो...
तुर्कियेत कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक लहान मुलगा बाहेर येताना दिसत आहे
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढताना बचाव पथक. याकामी सर्वसामान्य नागरिकांचीही मदत घेतली जात आहे.
भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढताना बचाव पथक.
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेली कार.
तुर्कियेतील पाझरसिक शहरातील हे विदारक दृश्य.
तुर्कियेच्या पाझरसिक शहरात भूकंपामुळे कोसळलेली इमारत.
तुर्कियेच्या कहरामनमारास येथे भूकंपामुळे भुईसपाट झालेली इमारत.
तुर्कियेतील भूकंपानंतर उद्भवलेली स्थिती.
तुर्कियेच्या दियारबकीर शहरातील बचाव कार्यात गुंतलेले कर्मचारी.
तुर्कियेच्या दियारबकीर शहरातील बचाव कार्यात गुंतलेले कर्मचारी.
सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ शहरात जखमींना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात नेण्यात येत आहे.
दियारबाकीरमध्ये भूकंपानंतर बचाव पथक ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागिकांचा शोध घेत आहे.