आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कियेसह चार देशांमध्ये (लेबनॉन, सीरिया आणि इस्रायल) सोमवारी सकाळी 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. चार देशांमध्ये एकूण 521 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक नुकसान तुर्कियेमध्ये झाले आहे. येथे 284 लोक मारले गेल्याची पुष्टी झाली आहे. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी तुर्कीला लवकरात लवकर मदत पाठवण्याचे आश्वासन दिले.
नेदरलँडच्या एका शास्त्रज्ञाचे एक ट्विट व्हायरल होत आहे. त्याचे नाव फ्रेंक होगरबीट्स आहे. 3 फेब्रुवारीला फ्रेंकने एक ट्विट केले. त्यात त्याने दक्षिण मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो, असे म्हटले होते. यास भविष्यवाणी, आशंका किंवा आकलन किंवा इतर कोणतेही नाव देता येईल. परंतु सत्य हे आहे की फ्रेंकचे शब्द खरे ठरले आहेत.
फ्रेंक Hogarbites कोण ?
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंक हॉगरबिट्स हा मूळचा नेदरलँडचा आहे. ते सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) नावाच्या भूवैज्ञानिक संस्थेतील वरिष्ठ संशोधक आहे. SSGEOS विशेषतः जमिनीच्या आतील हालचालींवर संशोधन करतो. फ्रेंकने 3 फेब्रुवारीला केलेले ट्विट आता व्हायरल होत आहे.
आणखी एका शास्त्रज्ञाने सांगितले की, फ्रेंक होगरबीट्स हा चंद्र आणि ग्रहांच्या आधारे भविष्यवाणी करतो. अनेकवेळा त्यांचा अंदाजही चुकीचा ठरला आहे. पण, तुर्कस्तान-सीरिया सीमेवर सोमवारी झालेल्या भूकंपात फ्रेंकचे म्हणणे तंतोतंत खरे ठरले. विशेष म्हणजे फ्रेंकने सोमवारी पुन्हा सांगितले की, एवढ्या मोठ्या भूकंपानंतर आफ्टरशॉक्स (मोठ्या भूकंपानंतर येणारे कमी तीव्रतेचे धक्के) 4 ते 5 तीव्रतेचे असतील. त्याचे म्हणणे बरोबर असल्याचेही सिद्ध झाले. त्याच तीव्रतेचे 66 आफ्टरशॉक आल्याची कबुली खुद्द तुक्रिये सरकारनेच दिली आहे.
आता बर्फवृष्टीचा त्रास
तुक्रियेच्या अनेक भागात पारा शून्याच्या खाली गेला असून थंडी पडू लागली आहे. विमानतळाची धावपट्टी खराब झाली आहे. त्यामुळे तुर्की सरकार आणि जगातील अनेक देशांना येथे मदत साहित्य पाठवणे कठीण होत आहे.
भूकंप झाला तेव्हा तुक्रियेच्या अनेक भागांत अजूनही प्रचंड बर्फवृष्टी होत होती. त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. एका अहवालानुसार, कमी दृश्यमानतेमुळे लष्करी विमानांना उड्डाण घेण्यासही त्रास होत आहे. आता सरकार मदत सामग्री ड्रॉप-इन पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत, आवश्यक मदत सामग्री कमी उंचीवरून थेट विमान किंवा हेलिकॉप्टरद्वारे प्रभावित भागात टाकली जाईल आणि खाली उपस्थित कर्मचारी ते गोळा करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवतील.
30 मिनिटांत सलग 3 मोठे भूकंप
तुक्रियेमध्ये 30 मिनिटांत भूकंपाचे तीन मोठे धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारा प्रांतातील गझियानटेप शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे 24 किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता हा भूकंप झाला. 6.7 तीव्रतेचा दुसरा धक्का 11 मिनिटांनी म्हणजे 4:28 वाजता आला. त्याचे केंद्र जमिनीपासून 9.9 किलोमीटर खाली होते. 5.6 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप देखील 19 मिनिटांनी म्हणजे 4:47 वाजता झाला.
सर्वाधिक विध्वंस या शहरांमध्ये झाला
अंकारा, गझियानटेप, कहरामनमारस, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी यासह 10 शहरांमध्ये प्रचंड विध्वंस झाला. येथे 1 हजार 710 हून अधिक इमारती कोसळल्याची बातमी आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनेक भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
10 हजार मृत्यूची भीती
दुसरीकडे, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्याच्या आकडेवारीनुसार, तुक्रियेमध्ये मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे. ही संख्या 10 हजारांपर्यंत पोहोचू शकते. USGS ने यापुर्वी असा तर्क केला की 1939 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, 1999 मध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 845 लोकांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.