आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कियेमध्ये भूकंपामुळे भीषण विध्वंस झाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. यातच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक कुटुंब या विनाशकारी भूकंपातून बचावल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ढिगाऱ्याखालून चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात येत असल्याचे दिसून येते. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे.
राष्ट्राध्यक्ष अर्दोन यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान शोयलू यांनी सांगितले की, भूकंपाचा देशातील 10 शहरांवर मोठा परिणाम झाला आहे. ही शहरे म्हणजे काहमानमार्श, हाताय, गझियानटेप, उस्मानी, अदियामन, सानलिउर्फा, मालत्या, अडाना, दियारबाकीर आणि किलिस ही आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देशाच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला अशा परिस्थितीत कोणत्या प्रकारची मदत देता येईल, याचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी म्हटले आहे की, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे अमेरिका चिंतेत आहे. त्यांनी म्हटले की, मी तुर्कस्तानमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आम्ही या परिस्थितीत मदत करण्यास तयार आहोत. आम्ही तुर्कीमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
पीएम मोदींनी शोक व्यक्त केला
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमधील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, तुर्कियेमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे दु:ख झाले. पीडित कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. भारत तुर्कियेच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
7.8 तीव्रतेचा भूकंप, 4 देशांमध्ये विध्वंस; 521 मृत्यू
मध्यपूर्वेतील चार देश तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळत आहे. तुर्कीमध्ये आतापर्यंत 284 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 440 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सीरियामध्ये 237 लोक मारले गेले तर 639 जखमी झाले. लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु येथे कोणतेही नुकसान झाले नाही. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.