आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीचे बदलले नाव:नव्या 'तुर्किये' नावाला संयुक्त राष्ट्राने दिली मान्यता, जुन्या नावावर जनतेची होती हरकत

अंकाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीचे नाव आता तुर्किये झाले आहे. राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यप एर्दोगन यांच्या सरकारने गत डिसेंबरमध्ये नाव बदलण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी बुधवारी तुर्कीचे नाव बदलण्याची विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा केली. ते म्हणाले -तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलूत कावूसोग्लू यांनी एका पत्राद्वारे आपल्या देशाला यापुढे तुर्की नव्हे तर तुर्किये नावाने ओळखण्याची विनंती केली होती. आम्ही ही विनंती मान्य केली आहे.

काय आहे उद्देश?

तुर्कीत टर्की किंवा तुर्की शब्द नकारात्मक मानला जातो. त्यामुळे येथील नागरीक 1923 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच देशाचे उल्लेख तुर्किये म्हणून करत होते. राष्ट्राध्यक्ष एद्रोगनही प्रदिर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कियेला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. आता संयुक्त राष्ट्राने मान्यता दिल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

सरकारी दस्तावेजांवर यापूर्वीच नाव बदलले

राष्ट्राध्यक्ष एद्रोगान यांनी प्रशासनाला तुर्कीची संस्कृती लक्षात घेवून तुर्कीच्या जागी तुर्कियेचा वापर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार परदेशांत निर्यात करण्यात येणाऱ्या सर्वच उत्पादनांवर मेड इन तुर्की ऐवजी मेड इन तुर्कियेचा वापर करण्यात येत होता. तुर्कीच्या सर्वच मंत्रालयांच्या अधिकृत दस्तावेजांवरही तुर्किये लिहिण्यास सुरूवात झाली होती. चालू वर्षाच्या सुरुवातीस सरकारने नाव इंग्रजीत बदलण्याचा प्रचारही सुरू केला होता. त्यानुसार पर्यटनाशी संबंधित व्हिडिओत हॅलो तुर्किये म्हटले जात होते.

तुर्कीच्या सरकारी मंत्रालयांनी आपापल्या अधिकृत दस्तावेजांत पूर्वीपासूनच तुर्किये लिहिण्यास सुरुवात केली होती.
तुर्कीच्या सरकारी मंत्रालयांनी आपापल्या अधिकृत दस्तावेजांत पूर्वीपासूनच तुर्किये लिहिण्यास सुरुवात केली होती.

तुर्की शब्दावर काय होती हरकत?

तुर्कीचे अनेक अर्थ होतात. हे अनेक प्रकरणांत गृहीत धरले जात नाही, विशेषतः इंग्रजीत. वास्तविक तुर्कीला इंग्रजीत टर्की म्हटले जाते. टर्कीचा अर्थ मूर्ख असाही होतो. एवढेच नाही तर त्याचा अपयश म्हणूनही वापर केला जातो. टर्की नावाचा एक पक्षीही आहे. भारतात त्याला तीतर म्हटले जाते. उत्तर अमेरिकेतील ख्रिसमस पार्टीत त्याचे मांस चवीने सेवन केले जाते. त्यामुळे तुर्कीची स्वतःचे नाव बदलण्याची इच्छा होती. तसेही तुर्कीश भाषेत तुर्कीला तुर्कियेच म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...