आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Turkish Airstrikes On Iraq And Syria |Turkish Air Strikes Target Kurdish Militants In Syria And Iraq | Marathi News

इराक आणि सीरियावर तुर्कीचा हवाई हल्ला:दहशतवादी तळांवर केले बॉम्बस्फोट, इस्तंबूलमधील हल्ल्याचा बदला घेतला

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीने शनिवारी उत्तर सीरिया आणि उत्तर इराकमधील प्रतिबंधित कुर्द दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या तळांवरूनच दहशतवाद्यांनी इस्तंबूलवरील दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची माहिती दिली आहे.

तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये 13 नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर 81 जण जखमी झाले आहेत. सरकारने या हल्ल्यासाठी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) आणि सीरियन कुर्दिश वायपीजी मिलिशिया संघटनेला जबाबदार धरले होते. इस्तंबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून कुर्दिश दहशतवाद्यांच्या लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.

2 गावांवर हवाई हल्ले
तुर्कीने अल-बेलोनिया आणि दाहिर अल-अरब या गावांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सरकारने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी दोन स्फोट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अचूक हल्ल्याने दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त झाल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे.

इस्तंबूलमध्ये 13 नोव्हेंबरला बॉम्बस्फोट झाला होता

13 नोव्हेंबरला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 20 हून अधिक जणांना अटक केली होती. एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. अल जझिराने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने दावा केला होता की, या हल्ल्यात 3 लोक सामील होते. यापैकी एक महिला आणि दोन पुरुष होते.

दुपारी 4.15 च्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार - एक महिला जवळपास 40 मिनिटे बेंचवर बसली होती. यानंतर ती तेथे एक बॅग टाकून निघून गेली. काही मिनिटांनी स्फोट झाला. या बॅगेत बॉम्ब असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेची सहानुभूतीही नाकारली होती
इस्तंबूल हल्ल्यानंतर अमेरिका आणि तुर्कस्तानमधील संबंधांमध्ये तणाव दिसून आला. या हल्ल्यामागे कुर्दिश दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे तुर्की सरकारने म्हटले होते. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी अनेकदा उघडपणे सांगितले आहे की, अमेरिकन सरकार सीरियात उपस्थित असलेल्या कुर्दिश दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवते आणि हे दहशतवादी सीरियातून तुर्कीमध्ये हल्ले करतात.

यामुळेच इस्तंबूल हल्ल्यानंतर राजधानी अंकारा येथील अमेरिकन दूतावासाने हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला तेव्हा तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू म्हणाले– आम्हाला त्यांच्या सहानुभूतीची गरज नाही. अमेरिका कुर्दीश संघटनांना मदत करत आहे.

बातम्या आणखी आहेत...