आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा सामना करण्यासाठी जलद लसीकरणानंतर आता इंग्लंडने आणखी एक मोठी योजना सुरू केली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी अर्थव्यवस्था लाॅकडाऊननंतर पुन्हा सुरू करण्यांतर्गत या योजनेची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सूचना दिली आहे की, त्यांनी आठवड्यातून दोनदा चाचणी करावी. आराेग्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येकाला ९ एप्रिलपासून आठवड्यात दोनदा मोफत रॅपिड कोरोना चाचणी करता येईल. लोकांना जवळचे औषधांचे दुकान, कम्युनिटी सेंटर व होम डिलिव्हरी सेवेद्वारे मोफत चाचणी किट उपलब्ध केली जाईल. जॉन्सन ‘कोविड स्टेटस सर्टिफिकेशन’ योजना जाहीर करणार आहेत.
६.८ कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी आतापर्यंत ३.७ कोटी डोस दिले गेले आहेत. ४७% लोकसंख्येला कमीत कमी एक डोस दिला आहे. ५० लाख लोकांना दुसरा डोसही दिला गेला आहे. सरकारला वाटते की, पूर्ण लोकांची वेगाने चाचणी करून आणि कोविड स्टेटस सर्टिफिकेशन सिस्टिमद्वारे महामारीला नियंत्रित केले जाऊ शकते. युरोपात सर्वाधिक मृत्यू इंग्लंडमध्येच झाले आहेत.
दिलासा : अमेरिकेत १९० दिवसांनी ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण
जगात २४ तासांत ५.२६ लाख नवे रुग्ण आढळले. यामुळे आकडा १३.२ कोटी झाला. २४ तासांत ६४९० मृत्यू झाले. २४ तासांत भारतात विक्रमी १.०३ लाख रुग्ण आढळले. सर्वात बाधित अमेरिकेसाठी दिलासादायक वृत्त आहे. तेथे २४ तासांत ३६९८३ नवे रुग्ण आढळले. २७ सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच तेथे ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले. तसेच दुसरा सर्वाधिक बाधित ब्राझीलमध्ये ३१३५९ बाधित सापडले.
इंग्लंडमध्ये १७ मेपासून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची तयारी आहे. यासाठी एक ‘ट्रॅफिक लाइट’ यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यात कोरोनाच्या दृष्टीने जगातील इतर देशांना रेड, यलो, ग्रीन असे विभागले जात आहे.
तयारी : लॉकडाऊन उघडताना होऊ शकतो ‘कोविड पासपोर्ट’चा वापर
6 महिन्यांनी कटिंग : स्कॉटलंडमध्ये ६ महिन्यांनंतर सलून उघडले. रेनफ्रेवशायरमध्ये तर काहींनी एक वर्षानंतर केस कापले.
जपानमध्ये चौथ्या लाटेची भीती : टोकियो ऑलिम्पिकला १०९ दिवस राहिले आहेत. भीती आहे की, चौथी लाट न येवो.
बांगलादेश ७ दिवस कैद : बांगलादेशात सोमवारपासून लॉकडाऊन लागले. रस्ते सामसूम होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.