आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Twitter Account ! Twitter Owner Elon Musk's Account Hacked? Find Out What Exactly Is The Case, Latest News 

चक्क भोजपुरीत ट्विट करू लागले एलन मस्क:ट्विटरचे मालक एलन मस्क यांचे अकाऊंट झाले हॅक? जाणून घ्या- नेमकं काय आहे प्रकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत . त्यांच्या चर्चेचे कारण आहे, त्यांनी नुकतीच ट्विटरची केलेली डील. ट्विटरची सत्ता हाती घेताच मस्क यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा धडाका लावला. तसेच कंपनीचे बोर्ड देखील बरखास्त केले. अशातच चक्क एलन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कारण, त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चक्क भोजपुरी भाषेत पोस्ट केल्या जात आहे.

ट्विटरच्या मालकाचेच ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा झाली. दरम्यान, हे प्रकरण नेमके काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे एवढा गोंधळ उडाला आहे.

या सर्व प्रकाराने नेटकरी म्हणाले की, ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. अर्थात असे विचारणे देखील साहजिकच आहे. कारण एलन मस्क यांच्या अकाऊंटवरून भोजपुरी भाषेतील ट्विट पोस्ट केल्या जात आहे. अर्थात असे तर मुळीच होणार नाही की, एलन मस्क रात्रीतूनच हिंदी आणि भोजपुरी भाषा शिकले असतील. बर भाषा शिकली असेल असेही मान्य केले तरी ते भोजपुरी भाषेतील गाणे कशाला पोस्ट करतील. दरम्यान, हा सगळा प्रकार एका ट्विटर अकाऊंटवरून केला जात असल्याचे समोर आले आहे.

DP आणि कव्हर फोटो देखील सेम

हा सगळा गोंधळ ट्विटर यूजर्स @lawoolford मुळे उडाला आहे. ज्यात युजर्सने फ्लॅटफॉर्मवर आपले नाव बदलून ELON MUSK असे केले आहे. एवढेच नाही यूजर्सने डेस्कटॉप फोटो आणि कव्हर फोटो वर देखील एलन मस्क यांचा फोटो लावला आहे. जो फोटो मस्क यांच्या अधिकृत अकाऊंटला तसाच आहे.

दोन्ही अकाऊंटमध्ये वर्षांची तफावत

दरम्यान या सर्व प्रकारामुळे गोंधळ उडाला. तरी देखील एलन मस्क यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंटचे नाव Elonmusk असे आहे. तर त्यांनी 2009 मध्ये ट्विटर जॉईन केले होते. दुसरीकडे ज्या यूजर्सकडून एलन यांचा फोटो लावून व नाव बदलून भोजपुरी भाषेतील ट्विट केलेले आहे. त्या युजर्सने 2011 मध्ये ट्विटर खाते उघडलेले आहे.

...म्हणून अकाऊंट हॅक झाले नाही
या सर्व प्रकारामुळे एकंदरीत सिद्ध होते की, एलन मस्क यांचे अकाऊंट हॅक झालेले नाही. परंतू गोंधळ उडण्याचे एकमेव कारण म्हणजे दोन्ही अकाऊंट व्हेरिफाईड झालेले आहे. परंतू मस्क यांच्या चर्चेत आता भोजपुरी पोस्टची देखील नेटकरी चर्चा करू लागले आहेत, एवढेच म्हणावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...