आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सेलिब्रिटींचे ट्विटर अकाऊंट हॅक:बिल गेट्स, बेजोस, ओबामांसह 14 जणांचे टि्वटर अकाउंट हॅक; त्यांच्या खात्यांवरून बिटकॉइन डबल करण्याचे आमिष

शिरा फ्रँकल/कॅट कांगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत प्रथमच प्रसिद्ध व्यक्तीच्या सोशल मीडियाच्या खात्यात एकाच वेळी घुसखोरी

अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे टि्वटर अकाउंट्स बुधवारी प्रथमच एकाच वेळी हॅक करण्यात आले. यात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, अॅमेझाॅनचे जेफ बेजोस, टेस्लाचे अॅलन मस्क, वॉरेन बफे, माजी अध्यक्ष बराक ओबामा, गायक कान्ये वेस्टसह १४ नामवंतांचा समावेश आहे. अॅपल व उबेरसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचे अकाउंट हॅक करण्यात आले. या हॅकिंगला ‘बिटकॉइन स्कॅम’ असे नाव देण्यात आले आहे. कारण जे अकाउंट हॅक करण्यात आले त्यांच्यामार्फत टिवट करून लोकांकडे बिटकॉइन मागण्यात आले. हॅकर्सनी या प्रसिद्ध व्यक्तींचे अकाउंट्स हॅक करून पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये म्हटले, आम्ही तुमची मदत करू इच्छितो. तुम्ही जितक्या डॉलरच्या किमतीचे बिटकॉइन आमच्या खात्यात पाठवाल त्यापेक्षाही दुपटीची रक्कम आम्ही तुम्हाला परत करू. ३० मिनिटांत तुम्ही १००० डॉलर किमतीचे बिटकॉइन पाठवाल तर आम्ही २००० डाॅलरचे बिटकॉइन परत पाठवू. क्रिप्टो करन्सीचे व्यवहार पाहणारी साइट ब्लाॅकचेन डॉट कॉमने म्हटले, फसवणूक झाल्याचे कळण्यापूर्वीच ३०० लाेकांनी १.१६ लाख डॉलर म्हणजे सुमारे ८७ लाख रुपये किमतीचे बिटकॉइन त्या बनावट खात्यात पाठवले होते. याची लिंक हॅक करण्यात आलेल्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आली होती. मात्र, लाखो फॉलोअर्स असलेल्या या दिग्ग्जांच्या अकाउंट्सद्वारे पाठवलेले मेसेजच्या फसवणुकीची अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही.

महाराष्ट्र पोलिसांचे मार्गदर्शन : मेसेजची विश्वसनीयता तपासा

ट्विटरवर सायबर हल्ल्याची घटना पाहता महाराष्ट्र सायबर विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तो फेक नसल्याची खात्री करा. पासवर्ड सतत बदला आणि तक्रारीसाठी www.cybercrime.gov.in वर संपर्क साधावा.