आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेस्लाचे सीईओ एलन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनल्यानंतर कंपनीत बरेच बदल झाले आहेत. एलन मस्क हे सतत नवनवीन घोषणा करुन आपल्या ट्विटर युजर्सला आश्चर्यचकित करतात. आता त्यांनी पुन्हा एक अशीच घोषणा केली आहे. ज्यामुळे ट्विटर युजर्सला खूप आनंद झाला आहे. एलन मस्क यांनी ट्विटची मर्यादा 10,000 वर्णांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले.
ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी सोमवारी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म लवकरच लाँगफॉर्म ट्विट 10k पर्यंत वाढवत आहोत. कोडिंगशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करणारा यूट्यूबर एटदरेट द प्राइम अगेनने मस्कला विचारले की, डेव समुदाय आणि मी विचार करत होतो की ट्विटमध्ये कोड ब्लॉक जोडू शकता का? यावर त्यावर एलन मस्कने ट्विट करुन ही माहिती दिली.
अशा प्रतिक्रिया ट्विटर युजर्सनी दिल्या
ट्विटर सीईओच्या पोस्टवर अनेक यूजर्सनी आपले मत व्यक्त केले आणि काहींनी त्यावर आनंद व्यक्त केला तर काही जण संतापले. एका युजरने म्हटले की, तू एक वेडा माणूस आहेस. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, खरोखर चांगली बातमी आहे.
गेल्या महिन्यातही एक मोठी घोषणा
गेल्या महिन्यात, कंपनीने जाहीर केले की, यूएसमधील ब्लू टीक असलेले सदस्य प्लॅटफॉर्मवर 4,000 वर्णांपर्यंतचे ट्विट पोस्ट करू शकतात. केवळ ब्लू सदस्यच लांब ट्विट पोस्ट करू शकतात. परंतु सदस्य नसलेले ते वाचू शकतात, त्यांना उत्तर देऊ शकतात, रीट्विट करू शकतात आणि कोट करू शकतात. पूर्वी, ट्विट केवळ 280 वर्णांपुरते मर्यादित होते, जे अद्याप सदस्य नसलेल्यांना लागू होते.
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती
टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे. टेस्लाचे शेअर्स 5.5% वाढून 207.63 डॉलर्सवर पोहोचले, यामुळे मस्क यांची संपत्ती वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्सनी (सुमारे 15.4 लाख कोटी रुपये) वाढली आहे.
बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात मोठ्या फॅशन ग्रुप लुईस विटो मोएट हेनेसी (LVMH) चे CEO आहेत. त्यांची एकूण संपत्ती 185.3 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.32 लाख कोटी रुपये) आहे. अरनॉल्ट यांनी डिसेंबरच्या मध्यात मस्क यांच्याकडून पहिला क्रमांक हिरावून घेतला होता. तेव्हापासून ते प्रथम स्थानावर राहिले. अरनॉल्ट यांना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
एलन मस्क यांचे सीक्रेट्स:जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पृथ्वीवर कोणतेही घर नाही
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. यासाठी ते प्रति शेअर 54.20 डॉलर या हिशेबाने 3.20 लाख कोटी रुपये रोख देण्यास तयार आहेत. आता ट्विटरची विक्री होईल किंवा नाही, पण या ऑफरमुळे एलन मस्क पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
आम्ही येथे एलन मस्क यांच्या जीवनातील काही रंजक तथ्य देत आहोत. यापैकी अनेक गोष्टी अशा असतील ज्या कदाचित तुम्हाला आधीच माहिती असतील. पण अशा अनेक गोष्टी असतील ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला जाणून घेऊया, अशा व्यक्तीची कहाणी ज्याचे पृथ्वीवर घर नाही, पण त्याला मंगळावर वसाहत स्थापन करायची आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.