आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरने BBC ला दिले 'गव्हर्नमेंट फंडेड मीडिया'चे लेबल:कंपनीने म्हटले- तातडीने हे हटवा, मस्क म्हणाले- मग BBC चा अर्थ काय आहे?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला 'गव्हर्नमेंट फंडेड मीडिया' असे लेबल दिले आहे. बीबीसीच्या व्हेरिफाईड अकाऊंटवर गोल्डन टिकसह गव्हर्नमेंट फंडेड मीडियाचा टॅग लावण्यात आला आहे. हा टॅग लावल्यानंतर बीबीसीने ट्विटर व्यवस्थापनासमोर आक्षेप नोंदवत हे प्रकरण तातडीने सोडवण्याचा दावा केला आहे.

बीबीसीने म्हटले आहे की ट्विटरने आमच्यावरून हे लेबल तातडीने हटवले पाहिजे. बीबीसीने म्हटले आहे की या संदर्भात ते ट्विटरसोबत चर्चा करत आहेत आणि लवकरच हे दुरूस्त केले जाईल. माध्यम कंपनीने म्हटले आहे की आम्ही स्वतंत्र आहोत आणि नेहमीपासूनच राहिलो आहोत. आम्हाला लायसन्स फीसच्या माध्यमातून केवळ ब्रिटनची जनताच निधी देते.

ट्विटरने कोणतेही कारण सांगितले नाही

बीबीसी ट्विटर अकाऊंटचे 22 लाख फॉलोअर्स आहेत. त्यावर बीबीसीचे टीव्ही कार्यक्रम, रेडियो शो, पॉडकास्ट, ब्रेकिंग, न्यूज स्टोरी इ. अपडेट शेअर केले जातात.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, बीबीसी न्यूज आणि बीबीसी ब्रेकिंग न्यूजसह बीबीसीच्या इतर अकाऊंटसना मात्र हे लेबल देण्यात आलेले नाही. ट्विटरने बीबीसीला गव्हर्नमेंट फंडेड मीडियाचे लेबल देण्याविषयी कोणतेही कारण सांगितलेले नाही.

मस्क यांनी विचारले बीबीसीचा अर्थ काय आहे

मस्क यांनी सोमवारी ट्विट केले, 'मग बीबीसीचा अर्थ काय आहे? मी विसरत असतो'

या माध्यम संस्थांवर दिसत आहे गोल्डन टिक

गव्हर्नमेंट फंडेड मीडियाचा अर्थ असा होतो की त्या संस्थेला सरकारकडून निधी दिला जात आहे आणि यामुळे त्या संस्थेच्या धोरणांवरही सरकार परिणाम करू शकते. ट्विटरचे गोल्ड टिक आता त्या आऊटलेटसवर दिसत आहे, जे सरकारी निधीद्वारे चालतात.

यात पीबीएस, एनपीआर, व्हॉइस ऑफ अमेरिका आणि बीबीसीचा समावेश आहे. तथापि, कॅनडातील सीबीसी किंवा कतारच्या अल जजीरासारख्या इतर सरकार समर्थित आऊटलेटसवर असे लेबल दिसत नाही.

ट्विटरच्या ब्ल्यू टिकला मस्क यांनी सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅनमध्ये रुपांतरित केले

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले होते. ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर त्यांनी ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅनमध्ये रुपांतर केले. आता ट्विटर खात्यांना ब्ल्यू टिकसह गोल्ड आणि ग्रे टिक दिले जात आहे.

ही बातमी वाचा...

9 वर्षानंतर संपणार येमेनमधील युद्ध:सौदी-ओमानच्या शिष्टमंडळाने हुथी बंडखोरांशी केली चर्चा, USला जे जमले नाही ते चीनने करून दाखवले