आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१८ वर्षीय मणिल हडजौदज पॅरिसमधील सोरबोन विद्यापीठाच्या बाहेर पत्रके वाटत आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरची काळजी आही की नाही? अशा घोषणा तो पुन्हा पुन्हा देत आहे. ई-स्कूटरवर बंदी घालण्यासाठी रविवारी मतदान झाले. लोकांनी बंदीच्या विरोधात याविरोधात मतदान करावे, यासाठी हडजौदजला पॅरिसमधील ई-स्कूटर भाड्याने देणाऱ्या ३ कंपन्यांनी कामावर ठेवले आहे. प्रत्यक्षात, ५ वर्षांपूर्वी पॅरिसच्या जीवनाचा भाग बनलेलेल ई-स्कूटर आता प्रचंड अडचणीचे ठरले आहेत. गर्दीच्या रस्त्यांवर लोक बेशिस्तपणे स्कूटर पळवतात. जागा नाही मिळाली तर फूटपाथवरून पळवायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
५ वर्षांत ई-स्कूटरची लोकप्रिययता इतकी वाढली की गेल्यावर्षी पॅरिसमध्ये १५ हजार रेंटल स्कूटरवरून दोन कोटी फेऱ्या झाल्या. आता या स्कूरटकडे धोका म्हणून पाहिले जात आहे. २०१९ मध्ये ई-स्कूटर आणि व्हॅनच्या धडकेत पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर कठोर नियम तयार करण्यात आले. ई-स्कूटरला वाहन समजले गेले. हेल्मेट अनिवार्य करण्यात आले. फूटपाथवर स्कूटर चालवण्यास बंदी घालण्यात आली. कमाल वेगमर्यादा प्रतितास ३० किलोमीटरवरून कमी करून १८ किलोमीटरवर आणण्यात आली. नियमाचा भंग केल्यास १४७ डॉलर (१२ हजार रुपये) दंडाची तरतूद करण्यात आली.
२०२० मध्ये ई-स्कूटर ऑपरेटर १६ वरून तीन करण्यात आले. नियम बदलल्यानंतरही ई-स्कूटरमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांत प्रचंड वाढ झाली आहे. २०२१ मध्ये फ्रांसमध्ये खासगी, भाड्याचे स्कूटर किंवा हॉवरबोर्डसारख्या वाहनांमुळे २४ मृत्यू झाले, ४१३ जण गंभीर जखमी झाले. २०२२ मध्ये हा आकडा वाढून ३४ झाला तर ५७० जण गंभीर जखमी झाले. फ्रेंच नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिननुसार, ई-स्कूटरच्या ९०0% गंभीर अपघातांत चालकाने हेल्मेट घातलेले नव्हते. दुसरीकडे, रविवारच्या मतदानामुळे स्कूटर कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
कंपन्यांचा तर्क : स्कूटरने ६०० शहरांत प्रदूषण रोखले, कारचा प्रवास १९% कमी केला कंपन्या ठासून सांगतात की, ई-स्कूटरने फ्रान्सच्या १०० शहरांसह जगभरातील ६०० शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत झाली. हे स्कूटर नसते तर १९% स्कूटर प्रवास कारने झाला असता. याच संशोधनात आढळले की, तीन चतुर्थांश लोक ई-स्कूटर सुविधा नसल्याने पायीच जातात, सार्वजनिक वाहनांचा वापर करतात किंवा दुचाकीला पसंती देतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.