आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योद्धे:कोरोनाच्या तडाख्यात सापडलेले दोन डॉक्टर बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेत रुजू; वाचा त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत.. 

पॅरिस 3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पॅरिसच्या डॉक्टर ऑरेली गॉऊल म्हणाल्या, आता कोराेना चांगलाच उमगलाय अन् मी आधीपेक्षाही मजबूत झालेय

पॅरिसच्या डॉक्टर ऑरेली गॉऊल यांना मार्चमध्ये एका रुग्णामुळे कोराेना संसर्ग झाला. ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्या त्रस्त झाल्या. आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून रुग्णांवर उपचारही करत अाहेत. 

आता कोराेना चांगलाच उमगलाय अन् मी आधीपेक्षाही मजबूत झालेय

‘मम्मी, मजबूत हो, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ डॉ. गॉऊल यांना कोराेना झाला तेव्हा त्यांच्या ४ व ६ वर्षांच्या दोन्ही मुलांनी हेच म्हणत त्यांची हिंमत वाढवली होती. त्या म्हणाल्या, संसर्गानंतरचे २-३ दिवस अत्यंत कठीण होते. मात्र आता मी बरी झालीय. आधीपेक्षाही मजबूत असल्यासारखं वाटतंय. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसोबत काम करणे जोखमीचे आहे, मात्र इतर डॉक्टरांच्या तुलनेत उपचार करणे हे माझ्यासाठी सोपं ठरेल. कारण आता मा‌झ्याजवळ माझा स्वत:चाच अनुभव आहे. मी सावध आहे, जोखीम घेणार नाही, हे पती व मुलांनाही माहीत आहे. दोन्ही मुलांना कोरोनाची माहिती आहे. कामामुळे मी प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत राहू शकत नाही हेही त्यांना ठाऊक आहे. मला माझ्या जबाबदाऱ्या निभवायच्या आहेत. संकटकाळात रुग्णांना माझी गरज असताना घरात बसून राहणे हे निराशाजनकच होते. अशा स्थितीला तोंड देण्यासाठीच तर आम्हाला प्रशिक्षित केले जात असते...

घरी राहणे सलत होते, रुग्णांना माझ्या कौशल्याची गरज आहे...

न्यूयॉर्कच्या डॉ. पॉल  साँडर्स हेही कोरोनाला हरवून पुन्हा रुग्णसेवेत उतरले आहेत. ते फुप्फुसांना ऑक्सिजन देण्याचे तज्ज्ञ आहेत. गंभीर कोरोनाग्रस्तांवर उपचारांचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. 

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क सिटीचे डॉ. साँडर्स बरे होऊन जेव्हा मायमॉनेडीज मेडिकल सेंटरमध्ये परतले तेव्हा कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. डॉ. साँडर्स म्हणाले, हा आश्चर्याचा सुखद धक्का आहे. रुग्णांसाठी हाेत असलेली मेहनत पाहून सर्वांचे आभार मानावेच लागतील... पुन्हा रुजू झाल्याने मला हायसं वाटतंय.’ त्यांच्या या उत्तराने तर टाळ्यांचा कडकडाट आणखीच वाढला. ते म्हणाले, सर्वजण परिश्रम करत असताना मी घरी होतो. ही बाब मला सलत होती.  कामावर परतण्यासाठी मी अधीर होतो. आयसीयूत एकाच व्हेंटिलेटरद्वारे अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे माझे काम आणखीच महत्त्वपूर्ण झाले. त्याची कोणत्या रुग्णाला कधी व किती गरज असते हे मला ठरवावे लागते. डॉक्टर्स व स्टाफ सुविधा त्यागून काम करत आहेत. प्रचंड थकूनही ते दररोज रग्णसेवेच्या भावनेपोटी कामावर येत आहेत. कारण त्यांना रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे पाहावयाचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...