आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या राजकीय नाट्यात अविश्वास प्रस्तावावरील मतदानानंतर इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले. इम्रान सरकारच्या विरोधात शनिवारी संसदेत दिवसभर गदारोळ झाला. सायंकाळी संसदेचे कामकाज इफ्तारसाठी स्थगित केले गेले तेव्हा अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला होता. पंतप्रधान इम्रान यांनी कायदा, संसदीय सल्लागार तसेच कॅबिनेटची आणीबाणीची बैठक बोलावली होती. सरकार पाडण्यासाठी कथित अमेरिकन कटाला उघड करण्याची अधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली. एका इंग्लिश वृत्तपत्रानुसार बैठकीत सहभागी होण्यासाठी नॅशनल असेंब्लीचे सभापती, उपसभापतीदेखील पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले होते. परंतु त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या जवळील हिरवळीवर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. त्याच वेळी दोन जण (बहुदा लष्करप्रमुख कमर बाजवा आणि आयएसआय प्रमुख नदीम अंजुम) सशस्त्र जवानांच्या बंदोबस्तासह हेलिकॉप्टरने पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाले. इम्रान यांनी त्यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.
बैठकीत ताणाताणी झाल्याचे सांगण्यात आले. हे दोघे येऊन भेटतील, असे इम्रान यांना मुळीच वाटले नव्हते. त्याच्या एक तासापूर्वी इम्रान यांनी बैठकीत उपस्थित एका वरिष्ठ अधिकाऱ्यास हटवण्याचे आदेश दिले. त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी या हेलिकॉप्टरने येतील अशी इम्रान यांना अपेक्षा होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदेतील गदारोळ शांत होईल, असा त्यांचा कयास होता. तसेही घडले असते, परंतु त्यांच्या आदेशानुसार संरक्षण मंत्रालयाने सूचना काढली नाही. अशा प्रकारे इम्रान यांचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत. काही वेळाने इम्रान यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडल्याचे वृत्त आले. इम्रान यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली असती तर त्यास इस्लामाबादच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी होती. महागाई गगनाला, रोज १४०० कोटींचे कर्ज
नवीन पाकिस्तान घडवू, असे स्वप्न दाखवून इम्रान सत्तेवर आले होते. २०१८ मध्ये त्यांनी रोजगार, अर्थव्यवस्थेला बळकट करू असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात उलट घडले. पाकिस्तानात जानेवारीमध्ये महागाई १३ टक्क्यांवर पोहोचली. इम्रान सत्तेवर येत असताना देशात महागाई दर ५.८ टक्के होता. दूध, आटा, तांदूळ यांचेही दर १४ टक्के वाढले आहेत. पेट्रोल-डिझेल वर्षात ४५ टक्के वाढले. दररोजचे कर्ज १४०० कोटी रुपयांनी वाढले.
चलन दरात ४६ टक्के घसरण
परकीय गंगाजळीत किरकोळ वाढ झाली. पाकिस्तानी रुपया २०१८ च्या तुलनेत ४६ टक्के घसरून १७७.४७ रुपये प्रति डॉलरवर गेला.
पाक कर्जात १७० टक्के वाढ
१८ लाख कोटींचे कर्ज वाढून ४३ लाख कोटी पाकिस्तानी रुपयांवर (फेब्रुवारीपर्यंत) गेले. साडेतीन वर्षांतील कर्ज ७१ वर्षांतील एकूण कर्जाच्या ७१ टक्के आहे.
ठोक महागाई दर २४.३ टक्के
एक वर्षापूर्वी टोमॅटो ४७.६७ पाकिस्तानी रुपये होते. ८ एप्रिलला त्याचे दर १५४ रुपयांवर गेले. कांदा ३४ वरून ६२ रुपये किलो दराने विकला जात आहे. मोठेे आश्वासन, पण आधीचा पाकही राखण्यात असमर्थ
भ्रष्टाचार : इम्रानच्या सत्ताकाळात पाकमध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला. २०१८ मध्ये पाकिस्तान करप्शन, परसेप्शन इंडेक्समध्ये ११७ व्या क्रमांकावर आहे. यंदा त्यात आणखी घसरण झाली आहे. यंदा पाकचा क्रमांक १४० आहे. म्हणजेच ३३ क्रमांकाची घसरण झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.