आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या पायलट्सची जगभरात स्तुती:हीथ्रो एअरपोर्टवर वादळादरम्यान सुरक्षित उतरवले दोन विमान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाच्या दोन वैमानिकांच्या कौशल्याचे जगभरातून कौतुक होत आहे. कॅप्टन अंचित भारद्वाज आणि आदित्य राव अशी या दोन्ही वैमानिकांची नावे आहेत. ज्यांनी 18 फेब्रुवारी रोजी ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळावर वादळाच्या वेळी एअर इंडियाची दोन विमाने सुरक्षितपणे उतरवली होती.

रिपोर्टनुसार, अंचित भारद्वाज हे हैदराबादहून टेकऑफ झालेल्या AI-147 फ्लाइटचे उड्डाण करत होते, तर आदित्य राव गोव्याहून AI-145 टेकऑफचे पायलट होते. या दोघांचे कौतुक करताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपल्या कुशल वैमानिकांनी लंडनमधील हिथ्रो विमानतळावर त्यांची विमाने अशा वेळी लँड केली जेव्हा इतर अनेक एअरलाइन्स असे करु सकल्या नाहीत.

युनूस वादळाने केले त्रस्त
युनिस चक्रीवादळामुळे हिथ्रो विमानतळावर त्यावेळी जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने अनेक उड्डाणे बंद ठेवली होती, मात्र एअर इंडियाच्या दोन्ही वैमानिकांनी त्यांची विमाने सुखरूप उतरवली. दोन्ही फ्लाइटचे लँडिंग बिग जेट टीव्ही नावाच्या यूट्यूब चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपित केले गेले.

400 हून अधिक उड्डाणे रद्द
युनिस चक्रीवादळामुळे ब्रिटेनमध्ये 400 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. लंडनमधील हिथ्रो विमानतळावर अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले. त्याचबरोबर बेल्जियम आणि आयर्लंडमधील उड्डाणेही वादळामुळे रद्द करण्यात आली होती.

अनेकांचा मृत्यू, लोक घरात लपलेय
युनिस चक्रीवादळाने वायव्य युरोपातील वाहतूक नेटवर्क विस्कळीत केले आहे आणि किमान 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये ब्रिटन, आयर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी आणि पोलंड यांचा समावेश आहे. युनिसमुळे बेल्जियम आणि युनायटेड किंगडममध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ब्रिटनमधील सुमारे 2 लाख घरांची वीज गेली आहे. येथे लंडनच्या इनडोअर स्टेडियम O2 अरेनाचे छत जोरदार वाऱ्याने उडून गेले आहे. त्याचबरोबर वादळामुळे लोक अजूनही घरातच लपून बसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...