आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बर्लिन येथील स्टोअरमध्ये अशात खाद्यपदार्थांवर दोन प्रकारच्या किमती दिसत आहेत. एकावर विक्रीची किंमत आहे, तर दुसऱ्या टॅगवर या वस्तूच्या निर्मितीसाठी आलेल्या खर्चाची वास्तविक किंमत. लोकांना पूर्वीप्रमाणेच विक्रीची किंमत द्यावी लागणार असली तरी या दोन्ही किमती टाकण्याचा उद्देश असा की, लोकांना आपण ही वस्तू अत्यंत स्वस्तात खरेदी करत अाहोत हे कळावे. तसेच या वस्तू इथवर पोहोचवण्यासाठी समाज तसेच पर्यावरणाला किती किंमत चुकती करावी लागत आहे हेही उमजावे.
वास्तविक, जर्मनीमध्ये खाद्यपदार्थांच्या विशेषत: दुधापासून तयार होणाऱ्या तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या किमती खूप कमी आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांनुसार, या खाद्यपदार्थांच्या किमतीसोबत त्यासाठी येणारा खर्चही नमूद असावा, जेणेकरून उत्पादनादरम्यान येणारा किती खर्च आपण चुकता करत आहोत हे लोकांना कळावे. यामुळे खाद्यान्नाची नासाडी तर कमी होईलच, शिवाय लोकांना भोजनाचे महत्त्वही कळू लागेल. २०१६ च्या एका अहवालानुसार, युरोपीय संघातील देशांत दरवर्षी ८.८ कोटी टन अन्न कचराकुंडीत फेकले जाते. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारतात रोज १९.४ कोटी लोक अर्धपोटी राहतात आणि दुसरीकडे दरवर्षी सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे अन्न वाया जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.