आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Two Weeks Lockdown Due To Delta Variant In Australia; 29 Patients Were Found In 24 Hours; News And Live Updates

कोरोना संकट:ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; 24 तासांत 29 रुग्ण आढळले

कॅनबेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये कोरोनाचा दक्षिण अमेरिकी व्हेरिएंट आढळला

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (स्वरूप) संपूर्ण जगाच्या चिंतेचे कारण ठरला आहे. डेल्टाने बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियाने ग्रेटर सिडनी, ब्लू माउंटेन, सेंट्रल कोस्ट व वोलोंगाँगमध्ये लॉकडाऊन लावला आहे. त्याची सुरुवात शनिवारपासून झाली. हा लॉकडाऊन सध्या दोन आठवड्यांसाठी आहे. सरकारने निर्बंध कडकपणे लागू केले आहेत.

सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण न्यू साउथ वेल्स राज्यात निर्बंध लागू राहतील. या दरम्यान घरांत पाचपेक्षा जास्त पाहुणे येण्यास मनाई करण्यात आली आहे. खुल्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत परिसराची क्षमतेच्या निम्मे लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सर्वत्र मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत २९ रुग्ण आढळले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णसंख्येत आणखी वाढ होऊ शकते.

गरीब देश वंचित, श्रीमंत देशांनी लक्ष द्यावे
जागतिक आरोग्य संघटनेने गरीब देशांत लसीकरणात घट झाल्यावरून चिंता व्यक्त केली. संचालक टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयेसस म्हणाले, श्रीमंत देश विविध प्रकारच्या निर्बंधानंतर आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आफ्रिकेत सर्वाधित चिंता वाटणारी परिस्थिती आहे. गेल्या आठवड्यात येथे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ४० टक्के वाढले आहे.

जगभर : अमेरिका अफगाणला ३० लाख डोस देणार
अमेरिका अफगाणिस्तानला कोरोना लसीचे ३० लाख डोस उपलब्ध करून देणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची ही लस असेल. या लसी याच आठवड्यात अफगाणिस्तानला पोहोचवल्या जातील. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दक्षिण अमेरिकी व्हेरिएंट मिळाल्याने चिंता वाढली आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवला आहे.

बातम्या आणखी आहेत...