आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनच्या सरहद्दीवर एक लाखांहून जास्त रशियन फौजा तैनात आहेत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे संकट म्हणून युरोप त्याकडे पाहते. अमेरिका महिनाभरापासून युरोपसह युक्रेनला ‘मदत’ देऊ असे झुलवत राहिला आहे. परंतु सोमवारी जिनिव्हामध्ये होणाऱ्या नाटो व रशिया यांच्यातील बैठकीचे निमंत्रण युक्रेनला देण्यात आलेले नाही. मदतीपासून घूमजाव करणाऱ्या अमेरिकेच्या वागण्याने अडचणीत आलेल्या युक्रेनने आता आपल्या मध्यस्थांद्वारे रशियाशी तडजोडीच्या चर्चेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या महिन्यात बायडेन यांनी पुतीन यांच्याशी दोन व्हर्च्युअल बैठका घेतल्या. त्यानंतर युक्रेनमध्ये प्रत्यक्ष सैन्य कारवाईसाठी नकार दिला. युक्रेनला आता फसवणूक झाल्यासारखे वाटू लागले आहे. रशियाने देखील या संकटाच्या नावाखाली युरोप व अमेरिकेसमोर काही अटी थोपवले.
लष्करी संकटाचे तीन देश
1 अमेरिकेची रशियाला घेरण्यासाठी आर्थिक, तांत्रिक, लष्करी निर्बंधाची रूपरेखा तयारी. जागतिक व्यापार रोखण्याचे प्रयत्न, सोलर विंड सारख्या सायबर हल्ल्यांचा मुकाबला.
2 रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री राबाकोव्ह म्हणाले, नाटोसोबत बैठकीत युक्रेन मुद्यावर झुकणार नाही. सीमेवरील १ लाख सैन्याची तैनाती आत्मसंरक्षणासाठी. नाटोने युक्रेनला संघटनेत सहभागी करून घेऊ नये.
3 युक्रेनचे मुत्सद्दी येलिसेव्ह म्हणाले, रशियाने युक्रेनला ‘आेलीस’ ठेवले आहे. मॉस्कोच्या दबावामुळे नाटोने युक्रेनला बैठकीचे निमंत्रणच दिले नाही. अमेरिकेची मदत नको. रशियाशी चर्चेतून तोडगा काढू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.