आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएईची अर्थव्यवस्था कोरोनापूर्वीसारखी:2021 च्या सहामाहीत हॉटेल रिझर्व्हेशन जगात दुसऱ्या क्रमांकावर, येत्या सहा महिन्यांत 1.7 कोटी लोकांच्या स्वागताची तयारी

दुबई / शानीर एन सिद्दीकी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुबई एक्स्पोपूर्वीच यूएई पर्यटकांनी गजबजली, हॉटेल रिझर्व्हेशनासाठी पर्यटकांची घाई

दुबई एक्स्पो सुरू होण्यास ३ दिवस बाकी आहेत. बाजारात वेगळाच उत्साह दिसत आहे. एक्स्पोच्या सहा महिन्यांत यूएई जगातील सर्वात आवडते स्थळ बनू पाहत आहे. एक्सपोमध्ये २.५ कोटी लोक येतील, असा अंदाज आहे. यात १.७ कोटी परदेशी असतील. जर हा इव्हेंट अपेक्षेप्रमाणे झाला तर यूएईला सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल. कोरोनाकाळात झालेल्या नुकसानीची भरपाई या एक्स्पोमुळे व्याजासह भरून निघेल, अशी येथील हॉटेल, एअरलाइन्स, ट्रॅव्हल सेक्टरला आशा आहे. एक्स्पो सुरू होण्यापूर्वीच येथील अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारी ते जुलैपर्यंत ३० लाख लोक पोहोचले. हॉटेल रिझर्व्हेशनच्या बाबतीत दुबई जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत हॉटेल आणि पर्यटन प्रतिष्ठानांनी ८३ लाख पाहुण्यांना आकर्षित केले आहे. हे प्रमाण २०२० च्या पहिल्या सहामाहीच्या १५% जास्त आहे. या दरम्यान पाहुण्यांनी हॉटेलमध्ये ३.५ कोटी रात्र घालवल्या आहेत ज्या ३०% वृद्धी दर्शवत आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये महसूल वाढ ३१% राहिली.

पाहुण्यांच्या एकूण संख्येत७०% हिस्सेदारी परदेशी पर्यटकांची राहिली आहे. जीसीएएसच्या डेटानुसार यूएईचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण संख्या ऑगस्टमध्ये २५ लाखांवर पोहोचली. जी २०२० च्या याच कालावधीत ८.१४ लाख होती. म्हणजेच २०७ % वाढ झाली आहे. यूएईमध्ये हॉटेल रिझर्व्हेशनात एक्स्पो २०२० दुबईआधी वृद्धी दिसून आली. हॉटेल बुकिंग वेसाईट ‘वीगो’ने इव्हेंट कालावधीदरम्यान दुबईचा हवाई प्रवास आणि हॉटेल रिझर्व्हेशनसाठी ५ लाखाहून अधिक सर्च झाल्याचे नमूद केले. मेरियट इंटरनॅशनलच्या मध्यपूर्व क्षेत्राचे मुख्य संचलन अधिकारी संदीप वालिया म्हणाले की, ‘सर्वच संकेतांवरून स्पष्ट होते की , प्रवासाला मोठी मागणी दिसत आहे. दुबई पर्यटनासाठी सर्वाधिक मागणी कायम राहील, याचा आम्हाला विश्वास आहे.’ या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत यूएईची निर्यात ४५% वाढून २२०० कोटींपेक्षा अधिक राहिली. नॉन ऑइल एक्सपोर्ट ३१% वाढून ७२२.३ बिलियन दिरहम राहिला. यूएईत प्रति व्यक्ती २.६७ लस दिली गेली आहे.

एक्स्पोसाठी १८ स्टेशन, २०० लक्झरी बसेस आणि १५ हजारांवर टॅक्सी तैनात
व्यापाराला गती देण्यासाठी रोड अँड ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटीने ३०० कोटी रुपयांचे १५ प्रकल्प पूर्ण केले आहेत. यात मेट्रो स्टेशन, ५० मेट्रो ट्रेनची खरेदी, ९ उड्डाणपुलांसह १३८ लेन-किमी रस्त्यांची निर्मिती आदींचा समावेश आहे. यूएईच्या शहरांतील साईट जोडण्यासाठी १८ स्टेशन, १५ हजार टॅक्सी तैनात केल्या आहेत. साइटची ८०% उभारणीचा पुनर्वापर होईल. रिअल इस्टेट, शिक्षण, पर्यटन, परिवहन व पुरवठ्याच्या मूलभूत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...