आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएई अध्यक्षांचे निधन:शेख खलिफा यांनी दीर्घ आजारानंतर घेतला अखेरचा श्वास, यूएईत 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक

शारजाह2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांचे शुक्रवारी निधन झाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने खलिफा यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून यूएईमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सर्व सरकारी कार्यालये आणि मंत्रालये तीन दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये खाजगी क्षेत्राचाही समावेश आहे.

शेख खलिफा (उजवीकडे) 1971 मध्ये सरकारी परेड दरम्यान पाहुण्यासोबत
शेख खलिफा (उजवीकडे) 1971 मध्ये सरकारी परेड दरम्यान पाहुण्यासोबत

शेख खलिफा हे 3 नोव्हेंबर 2004 मध्ये संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक होते. त्यांचे वडील शेख जाएद बिन सुल्तान अल नह्यान 1971 ते 2004 पर्यंत राष्ट्रअध्यक्ष होते. ते यूएईचे पहिले राष्ट्रध्यक्ष होते. 1948 मध्ये शेख खलिफा यांचा जन्म झाला असून, ते अबुधाबीचे 16 ने शासक होते. त्यांनी यूएई आणि अबुधाबीत शासन व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात सुधारणा केली.

अनेक देशांमध्ये शोककळा पसरली

  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी यूएईला भेट देणार आहेत.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE च्या अध्यक्षाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले- महामहिम शेख खलिफा बिन झायेद यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. ते एक महान आणि दूरदर्शी नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-यूएई संबंध अधिक समृद्ध झाले. भारतातील लोकांच्या संवेदना यूएईच्या लोकांसोबत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.
  • भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी शोक व्यक्त केला आणि म्हटले आहे की - UAE चे राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकेचे खरे मित्र होते. अमेरिकन लोकांच्या वतीने, मी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व अमिराती लोकांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. आम्ही युनायटेड स्टेट्स आणि UAE मधील सरकार आणि लोक यांच्यातील दीर्घकालीन संबंध दृढ करत राहिल्याने आम्ही त्यांच्या स्मृतीचा आदर करू.
बातम्या आणखी आहेत...