आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • UAE Succeeds In 'liquid Nanoclay' Method Of Growing Fruits And Vegetables Like Watermelon, Snail In Desert, Now They Will Be Used Commercially

दिव्य मराठी विशेष:यूएईने ‘लिक्विड नॅनोक्ले’ पद्धतीने वाळवंटात टरबूज, गिलक्यासारखी फळे-भाज्या घेण्यात मिळवले यश, आता त्यांचा व्यावसायिक वापर होईल

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 दिवसांच्या प्रयोगानंतर वालुकामय जमिनीवर केली शेती, ‘नॅनोक्ले’त पाण्याचा वापर ४५ % कमी होईल

वाळूतही टरबूज आणि गिलके यांसारख्या फळे आणि भाज्यांची शेती करता येऊ शकते हे युनायटेड अरब अमिरातीने (यूएई) लॉकडाऊनमध्ये ४० दिवसांच्या प्रयोगानंतर सिद्ध केले आहे. यूएई वाळवंटी देश आहे. तो आपल्या ताज्या फळांची-भाज्यांची ९०% गरज आयात करून पूर्ण करतो. वैज्ञानिकांना वाळवंटात हे यश ‘लिक्विड नॅनोक्ले’ पद्धतीमुळे म्हणजे ओल्या चिकणमातीमुळे मिळाले आहे. हे मातीला पुनरुज्जीवित करण्याचे तंत्र आहे. या पद्धतीत पाण्याचा वापर ४५% कमी होईल. या यशानंतर यूएई आता मोठ्या प्रमाणावर लिक्विड नॅनोक्लेचे कारखाने उभारून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू करणार आहे.

लिक्विड नॅनोक्ले तंत्रज्ञानात चिकणमातीचे अत्यंत लहान कण द्रवरूपात वापरले जातात. आता मातीचे वाळूसोबत कसे मिश्रण करायचे म्हणजे ते उपयुक्त ठरेल असा प्रश्न होता. येथे सॉइल केमिस्ट्रीच्या ‘कॅटॉनिक एक्स्चेंज कॅपॅसिटी’च्या सिद्धांताचा वापर करण्यात आला. रासायनिक संरचनेमुळे चिकणमातीच्या कणांत निगेटिव्ह चार्ज, तर वाळूच्या कणांत पॉझिटिव्ह चार्ज असतो. नॅनोक्ले पद्धती विकसित करणाऱ्या डेझर्ट कंट्रोल या नॉर्वेच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओले सिवर्टसन यांच्या मते, परस्परविरोधी चार्जिंगमुळे जेव्हा चिकणमातीचा गोळा आणि रेती यांचे मिश्रण होते तेव्हा त्यांचे एक बंधन बनवतात आणि जेव्हा त्यांना पाणी मिळते तेव्हा त्यातील पोषक तत्त्व त्यांच्यासोबत चिकटतात. अशा पद्धतीने तयार होणारी माती पाणी रोखू शकते आणि तीत रोपे उगवू शकतात. तसे तर १५ वर्षांपासून हे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे, पण दुबईच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर बायो सलाइन अॅग्रीकल्चरमध्ये गेल्या १२ महिन्यांपासून त्यावर प्रयोग केला जात आहे. या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करता यावा हा त्यामागील हेतू आहे.

४० चौरस फुटांच्या शिपिंग कंटेनरमध्ये स्थापन होईल लिक्विड नॅनोक्लेचा कारखाना सिवर्टसन म्हणाले की, ४० चौरस फुटांच्या शिपिंग कंटेनरमध्ये लिक्विड नॅनोक्लेचा कारखाना उभारला जाईल. स्थानिक मातीचा वापर करून यूएईच्या वाळवंटात शेती करता यावी यासाठी असे असंख्य कंटेनर स्थापित केले जातील. अशा प्रत्येक कंटेनरमधून ४० हजार लिटर लिक्विड नॅनोक्ले प्रतितास या दराने उत्पादित केले जातील. पाण्याचा वापर ४५% कमी होईल, असा अंदाज आहे. सध्या एक चौरस मीटर जमिनीवर यासाठी १५० रुपयांचा खर्च येतो. गरीब देशांत हा खर्च १० पट कमी करण्याची गरज आहे.